Sunday, April 27, 2025
Homeनंदुरबारपाडळपूर येथे मृतावस्थेत आढळला बिबटया

पाडळपूर येथे मृतावस्थेत आढळला बिबटया

तळोदा | ता.प्र.- TALODA

तालुक्यातील रांझणी गावाजवळ पाडळपूर रस्त्यावरील पुलाजवळ नाल्यात बिबटया (leopard) मृतावस्थेत आढळून आला. सदर एक दीड वर्ष वयाच्या असल्याचा अंदाज आहे. बिबटयाला पहाण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

- Advertisement -

सिहोरहून परतताना अपघात; दोन महिलांचा मृत्यू

रांझणी गावाजवळ पाडळपूर रस्त्यावर पहाटे बिबटयांच्या भांडणाचा आवाज येत असल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले. आज सकाळी काही लोकांना बिबटया प्रवीण कदम यांच्या शेताजवळील नाल्यात मृतावस्थेत आढळून आला. ही वार्ता रांझणी गावासह परिसरात कळताच मृत बिबटयाला पहाण्यासाठी गर्दी झाली होती.

सिहोरहून परतताना अपघात; दोन महिलांचा मृत्यू

पशुधन विकास अधिकारी डॉ.विश्वास नवले यांनी शवविच्छेदन केले. शवविच्छेदनानंतर सदर बिबटयावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वनपाल राजविहिर वासुदेव माळी, राणीपूर वनपाल भारती सहयास, वनरक्षक वनपाल कोकणी, विरसिंग पावरा, बी.एस.जाधव, वनरक्षक गस्तीपथक विरसिंग पावरा, जाण्या पाडवी, भावना जाधव, रवींद्र पाडवी, चुणीलाल वळवी आदी उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : महिला प्रवाशाची पर्स चोरट्याने केली लंपास, पोलिसांत तक्रार...

0
शिरूर । तालुका प्रतिनिधी शिरूर परिसरात एका प्रवाशाची पर्स अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या चोरीत १६ ग्रॅम सोन्याचे दागिने, ८८ हजार रुपये...