Sunday, January 25, 2026
Homeमहाराष्ट्रविद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस थेट दरीत कोसळली; एका विद्यार्थ्यांचा मृत्यू, अनेक जखमी

विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस थेट दरीत कोसळली; एका विद्यार्थ्यांचा मृत्यू, अनेक जखमी

नंदुरबार। Nandurbar

सातपुडा पर्वतरांगांमधील देवगोई घाट परिसरातून एक अत्यंत भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक स्कूल बस अचानक शंभर ते दीडशे फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही दुर्घटना नंदुरबारमधील सातपुडा डोंगररांगेतील देवगोई घाट परिसरात घडली. ही स्कूल बस विद्यार्थ्यांना घेऊन जात असतानाच तिचा ताबा सुटला आणि ती थेट खोल दरीत कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की, बसचे मोठे नुकसान झाले आहे.

YouTube video player

अपघाताच्या वेळी बसमध्ये अंदाजे २० ते ३० विद्यार्थी प्रवास करत होते. बस दरीत कोसळल्याने या सर्व विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली आहे. या विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि तातडीने बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दरीत कोसळलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

बचाव पथकाच्या मदतीने जखमी विद्यार्थ्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. जखमी विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून, मृतांचा आकडा वाढू नये यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

ताज्या बातम्या

राज-का-रण : सिव्हिलची ‘शल्यक्रिया’ कधी होणार ?

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक सिव्हिल हॉस्पिटल हे खरंतर गोरगरिबांना चांगले उपचार मिळवून देऊन त्यांचे आशीर्वाद घेण्याचे ठिकाण. तेथे आरोग्याच्या दर्जेदार...