Saturday, May 4, 2024
Homeनंदुरबारसामोडेत आश्रमशाळेतील विद्यार्थ्याची आत्महत्या

सामोडेत आश्रमशाळेतील विद्यार्थ्याची आत्महत्या

पिंपळनेर  – 

सामोडे येथील एका अनुदानित आश्रमशाळेतील इयत्ता बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या 18 वर्षीय विद्यार्थ्यांचे पेट्रोल पंपासमोरच्या एका खाजगी शेतात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

- Advertisement -

डोंगर वेडू गावित (वय 18) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो काल सायंकाळी सात वाजेपासून आश्रमशाळेतून  बाहेर गेला असल्याचे सांगण्यात येते.आश्रमशाळेचे अधिक्षक नामदेव वाघ यांनी पोलिसात खबर दिली आहे.

सामोडे-पिंपळनेर  रस्त्यावर वै. हभप नामदेव चिंधु माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित आश्रमशाळा आहे. डोंगर वेडू गावित हा विद्यार्थी या आश्रमशाळेत इयत्ता बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होता.

शुक्रवारी डोंगर हा अधिक्षकास न सांगता शाळेच्या बाहेर निघून गेला. काल दि.6 रोजी सायंकाळी सात वाजेपासून तो बाहेर  गेल्याचे सांगण्यात येते.

आज सकाळी 10.30 वाजेच्या  दरम्यान डोंगर गावित याने पेट्रोल पंपाच्या पूर्वेस नाना रामदास घरटे याच्या शेतात झाडाला नायलान दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिस घटनास्थळी पोहचले. त्याल रूग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीयांनी त्याला मृत घोषित केले.

याबाबत पिंपळनेर पोलिसात अकस्मात मुत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक पंजाबराव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ.कोकणी हे करीत आहे.

मृत विद्यार्थी हा टाकलीपाडा, रायतेल गुलतारा ता.साक्री येथील मूळ रहिवासी आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी घुमरे व प्रकल्प कार्यालयातील अधिकार्‍यांनी देखील भेट दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या