Tuesday, March 25, 2025
Homeमुख्य बातम्याशरद पवारांनी किती मंदिरे बांधली; नारायण राणेंचा विरोधकांना सवाल

शरद पवारांनी किती मंदिरे बांधली; नारायण राणेंचा विरोधकांना सवाल

मुंबई | Mumbai

सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर 8 महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) वार्‍याच्या वेगाने कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनंतर राज्यातील विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. ही घटना घडल्यावर राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavhan) यांनी संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. यावर नारायण राणे (Narayan Rane) यांनी शरद पवारांवरच हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

नारायण राणेंनी म्हणाले की, शरद पवार (Sharad Pawar) यांनी किती मंदिरे बांधली सांगा, यांना चांगलं काहीचं दिसत नाही. मेलेल्या माणसाच्या टाळूवरच लोणी खाणारी माणसं आहेत. तसेच राहुल गांधींबाबत तर काय बोलावं, त्यांचा धर्म कोणता आहे, हेच कळत नाही. जे विरोधक आता पुतळ्याबाबत बोलत आहेत, त्यांनी 8 महिन्यांत पुतळा कसा झाला आहे, हे बघितलं का? त्याला एखादा हार घातला का? असा सवाल राणेंनी विरोधकांना केला आहे. तसेच सिंधुदुर्गात घडलेली पुतळा घटना दुर्दैवी आहे असे ही राणे म्हणाले.

या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही राज्य सरकारवर टीका केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...