Thursday, May 15, 2025
HomeनगरShrirampur : अंमली पदार्थ वाहतूक प्रकरणी दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल

Shrirampur : अंमली पदार्थ वाहतूक प्रकरणी दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

- Advertisement -

श्रीरामपूर तालुक्यातील (Shrirampur) दिघी रोडवर (Dighi Road) छोटा हत्ती या मालवाहू गाडीमध्ये अंमली  पदार्थांची (Narcotics) वाहतूक केल्याप्रकरणी दोन जणांना ताब्यात (Arrested) घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून सुमारे तेरा कोटी पंच्याहत्तर लाख, एकेचाळीस हजार रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त (Narcotics Seized) करण्यात आले आहे. सदर कारवाई उपविभागीय कार्यालय, स्थानिक गुन्हे शाखा (LCB), श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे (Shrirampur Police Station) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली.

उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांना एमआयडीसी परिसरात एका छोटा हत्ती टेम्पो मधून अंमली पदार्थाची वाहतुक होणार असल्याची माहीती मिळाली. याबाबत खात्री करण्यासाठी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तात्काळ पोलीस पथक एमआयडीसी (MIDC) परिसरात पोहचुन एमआयडीसी परिसर व आजुबाजुच्या गावात छोटा हत्ती टेम्पोचा शोध घेतला. त्यांना दिघी-खंडाळा रोडवर एक टाटा कंपनीचा एस मॉडेल छोटा हत्ती टेम्पो (क्र. एमएच 20 बीटी 0951) खंडाळ्याकडून दिघी गावाच्या दिशेने येताना दिसला. तेव्हा सदर टेम्पोला थांबवून सदर टेम्पोची झडती घेतली असता गाडीच्या मागील बाजूस पांढर्‍या रंगाच्या 21 गोण्या दिसुन आल्या. त्यापैकी 14 गोण्यांमध्ये पांढर्‍या रंगाची पावडर आणि उर्वरीत 7 गोण्यामध्ये पांढर्‍या रंगाचे स्फटीक होते.

वाहनचालक मिनीनाथ राशीनकर यास विचारपूस केली असता त्याने सदरची स्फटीक हे अल्प्राझोलम औषधाचे असून गोण्यांमधील पांढरी पावडर ही अल्प्राझोलम बनविण्याकरीता लागणारा कच्चा माल असल्याचे सांगितले. अल्प्राझोलम हा अंमली पदार्थ (Narcotics) असल्याने त्याबाबत खात्री करण्याकरीता अहिल्यानगर येथील फॉरेन्सीक तज्ञांशी संपर्क साधुन ते घटनास्थळी हजर होवून त्यांनी गोण्यांमधील स्फटीक व पावडर यांचे निरीक्षण करुन प्रथमदर्शनी सदरचे स्फटीक हे अल्प्राझोलम (Alprazolam) हा अंमलीपदार्थ व पावडर ही अल्प्राझोलम तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल असल्याचे सांगितल्याने सदरचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी (Police) त्या ठिकाणाहून 6 कोटी 97 लाख 67 हजार रुपयाचे 07 गोण्यामधील 69.767 कि.ग्रॅ वजनाचे अल्प्राझोलम चे स्फटिक (क्रिस्टल), 6 कोटी 76 लाख 74 हजाराचे 14 गोण्यामधील 338.37 कि. ग्रॅ वजनाचे अल्प्राझोलम बनवण्यासाठीची पावडर तसेच 1 लाख रुपयाचा टाटा एस कंपनीचा छोटा टेम्पो असा 13 कोटी 75 लाख 41 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी मिनीनाथ विष्णु राशीनकर (वय 38, रा. धनगरवाडी, ता. राहता), विश्वनाथ कारभारी शिपणकर (रा. दौड, जि.पुणे) यांच्या विरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात (Shrirampur Police Station) गुरनं. 499/2025 एन.डी.पी.एस. कलम 8 (क), 22(क), 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मिनीनाथ विष्णु राशीनकर याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे हे करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दुर्दैवी : अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी

0
  नगरसूल | वार्ताहर   अंतापूर ताहाराबाद येथून देव दर्शन करून घरी परत येणाऱ्या पिता-पुत्रावर काळाने घाला घातला असुन यात नगरसूल(ता.येवला)वडाचा मळा येथील पिता- पुत्राचा अपघातात दुर्दैवी...