Saturday, May 4, 2024
Homeधुळेनरडाणा पोलिसांनी रोखली गांजा तस्करी

नरडाणा पोलिसांनी रोखली गांजा तस्करी

धुळे dhule । प्रतिनिधी

शिरपूरकडून धुळ्याकडे होणारी गांजाची तस्करी (ganja smuggling) नरडाणा पोलिसांची (Nardana police) रोखली. सिनेस्टाईल पाठलाग करीत कारला पकडण्यात आले. कारचालकासह उस्मानाबाद जिल्ह्यातील दोघांना अटक करण्यात आली कारमधून 2 लाखांचा 24 किलो गांजा व 5 लाखांची कार असा सुमारे सात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.काल सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील हे कर्मचार्‍यांसह शासकीय वाहनाने मुंबई-आग्रा महामार्गाने पेट्रोलिंग करीत होते. तेव्हा त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक पांढर्‍या रंगाची कार शिरपूरकडून धुळ्याकडे गांजाची वाहतूक करीत आहे. त्यानुसार ते मुंबई-आग्रा महामार्गावरील माळीच पोलीस चौकी येथे थाबले. तेव्हा संशयीत कार भरधाव वेगाने धुळ्याच्या दिशेने जातांना दिसली.

वाहनास थांबण्याचा इशारा केला परंतू ती वेगाने निघून गेली. त्यामुळे पोलिस पथकानेही वाहनाचा पाठलाग सुरू केला. माळीच चौकीच्या पुढे वाहनाला पकडण्यात आले. वाहनातील दोघांना अटक करण्यात आली. रमेश चांगदेव मुरुमकर (वय 29) व युवराज यशवंत पवा (वय 36) रा.तित्रंज, ता.भुम, जि. उस्मानाबाद अशी दोघांनी त्यांची नावे सांगितली. तसेच वाहनाची तपासणी केली असता वाहनाच्या मागील सिटमध्ये केलेल्या कप्प्यांमध्ये एकूण 24 किलो 690 ग्रॅम वजनाचा हिरवट रंगाचा पान/बिया/काडयांचा चुरा असलेला गांजा सदृष्य अंमली पदार्थ मिळून आला. त्याची किंमत सुमारे 1 लाख 97 हजार 520 रुपये इतकी आहे. गांजा व सुमारे 5 लाख रूपये किंमतीची कार (क्र. एमएच 14 सीएक्स 9007) असा एकुण 6 लाख 97 हजार 520 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाने नरडाणा पोलिस ठाण्याचे सपोनि चंद्रकांत पाटील, पोहेकॉ भुषण खेडवन, माळी, पोना भरत चव्हाण, पोकाँ विनोद कोळी व रविंद्र महाले यांनी केली.

याप्रकरणी पोहेकाँ खेडवन यांच्या फिर्यादीवरुन नरडाणा पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अ‍ॅक्ट 1985 चे कलम 8 (क), 20 (ब) (आयआय) (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोसई राम दिवे हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या