दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori
९ ऑगस्ट हा आदिवासी दिन (World Tribal Day) म्ंहणून साजरा करण्यात येतो. या आदिवासी दिनाच्या दिवशी सर्व आदिवासी बांधवांना आदिवासी दिन साजरा करण्यात यावा, यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात यावी, यासाठी मागील तीन महिन्यांपासून प्रयत्न करण्यात येत होते. मात्र, त्यात काही बारकावे राहिल्याने ती झाली नाही.
हे देखील वाचा : अजित पवारांच्या ‘जनसन्मान यात्रे’त गुलाबी रंगाची हवा; गुलाबी जॅकेट, बस अन् बरचं काही
परंतु बहुल आदिवासी भाग असलेल्या महाराष्ट्रातील (Maharashtra) नंदुरबार, नाशिक, धुळे, जळगाव, पालघर, रायगड, पुणे, नांदेड, हिंगोली, अमरावती, नागपूर, गोदिंया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, भंडारा या आदिवासी बहुल जिल्ह्यातील (District) जिल्हाधिकार्यांना मुख्यमंत्र्यांकडून (CM) आदेश देण्यात आले आहेत.
हे देखील वाचा : Ajit Pawar : “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तात्पुरती…”; अजित पवारांचे दिंडोरीत मोठे विधान
त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये आदिवासी दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याची माहिती विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी दिली. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Ajit Pawar NCP) वतीने आयोजित करण्यात आलेल्या जनसन्मान यात्रेत बोलतांना त्यांनी ही माहिती दिली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा