Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकGokul Zirwal : अजितदादांच्या जनसन्मान यात्रेकडे गोकुळ झिरवाळांची पाठ; मनात चालले तरी...

Gokul Zirwal : अजितदादांच्या जनसन्मान यात्रेकडे गोकुळ झिरवाळांची पाठ; मनात चालले तरी काय?

नरहरी झिरवाळांच्या सौभाग्यवतीचा आदिवासी पेहराव

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

उपमुखमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) आजपासून (दि. ८) रोजी जनसन्मान यात्रा (Jan Sanman Yatra) नाशिकच्या दिंडोरीतून सुरु झाली आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ असा या यात्रेचा टप्पा असून यात्रेचा पहिला टप्पा ३१ ऑगस्टला संपणार आहे. पंरतु, आज दिंडोरीत झालेल्या जनसन्मान यात्रेला विधानसभेचे उपाध्यक्ष तथा दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांनी दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : अजित पवारांच्या ‘जनसन्मान यात्रे’त गुलाबी रंगाची हवा; गुलाबी जॅकेट, बस अन् बरचं काही

काही दिवसांपूर्वी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांचे सुपुत्र गोकुळ झिरवाळ (Gokul Zirwal) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची नाशिक येथे भेट घेऊन उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे वडिलांच्या विरोधात मुलगा उभा राहणार का? अशी चर्चा सुरु झाली होती. त्यावर झिरवाळांनी असे काही घडणार नाही, अशी स्पष्टोक्ती दिली होती.

हे देखील वाचा : Ajit Pawar : “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तात्पुरती…”; अजित पवारांचे दिंडोरीत मोठे विधान

दरम्यान, त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जनसन्मान यात्रेला गोकुळ झिरवाळ उपस्थित रांहतील का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. परंतु, या यात्रेकडे गोकुळ झिरवाळ यांनी पाठ फिरविल्याने नेमके गोकुळ झिरवाळांच्या मनात चालले तरी काय? याची चर्चा सध्या रंगू लागली आहे.

हे देखील वाचा : आदिवासी बहुल जिल्ह्यांत आदिवासी दिनाची सुट्टी जाहीर; विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळांची माहिती

नरहरी झिरवाळांच्या सौभाग्यवतीचा आदिवासी पेहराव

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या पत्नी चंद्रभागा झिरवाळ या साधेपणाने नेहमीच चर्चेत राहतात. आजही त्यांनी जनसन्मान यात्रेच्या कार्यक्रमास आवर्जुन उपस्थिती लावली. आदिवासी विधानसभेत होत असलेल्या कार्यक्रमानिमित्त तसेच उद्याच्या आदिवासी दिनानिमित्त झिरवाळांच्या सौभाग्यवती चंद्रभागा यांनी आदिवासी पेहराव करुन आपल्या संस्कृतीची ओळख करुन दिली. यावेळी उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या पेहरावाची विशेष चर्चा झाली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...