Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik Accident : समृद्धी महामार्गावर कारचा अपघात; बहीण-भावाचा मृत्यू, आठ जण जखमी

Nashik Accident : समृद्धी महामार्गावर कारचा अपघात; बहीण-भावाचा मृत्यू, आठ जण जखमी

सिन्नर | वार्ताहर । Sinnar

समृद्धी महामार्गावर तालुक्यातील पाटोळे शिवारातील (Patole Area) चॅनल क्रमांक ५७१.७ येथे मुंबईकडून सिन्नरच्या (Mumbai to Sinnar) दिशेने जाणाऱ्या कारचे पुढील टायर फुटल्याने भीषण अपघात होऊन बहीण-भावाचा मृत्यू (Brother and Sister Death) झाला तर आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

- Advertisement -

रविवारी (दि. १४) दुपारच्या सुमारास हा अपघात (Accident) झाला. टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कारने समोर चाललेल्या अज्ञात अवजड वाहनास जोरदार धडक दिली. मृतांत नीलेश विजय बुकाणे (३८)रा. मिलींदनगर, कल्याण आणि वैशाली सचिन घुसळे (३५) रा. चिंचपाडा, कल्याण या दोघा बहिण-भावाचा समावेश आहे. कल्याण येथील ११ प्रवाशी किया कार क्र. एमएच ०५ एफबी ७२५६ ने रविवारी सकाळी सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) फर्दापूर येथे एका विवाह सोहळ्यासाठी निघाले होते. सिन्नरच्या पाटोळे परिसरात आल्यावर कारच्या डाव्या बाजूचे टायर फुटल्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील कार पुढे चालणाऱ्या अज्ञात वाहनावर जाऊन धडकली.

YouTube video player

या अपघाताच्या जोरदार आवाजाने पाटोळे परिसरातील स्थानिक रहिवाशांनी समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) धाव घेतली. समृद्धी महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलिसांना या संदर्भात माहिती दिल्यानंतर तातडीने बचाव कार्य राबविण्यात आले. जखमींना उपचारासाठी सिन्नर येथे घेऊन जात असतानाच नीलेश बुकाणे यांचा मृत्यू झाला तर त्यांची बहिण वैशाली सचिन घुसळे (३५) हीची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. कारमधील छाया नीलेश बुकणे (३०), सचिन घुसळे (४०), अर्णव नीलेश बुक (१४), गोल्डी नीलेश बुकणे (१०), सुयश घुसळे (३), निरव गायकवाड (१०), मनस्वी गायकवाड (५), साची सचिन घुसळे (९) हे गंभीर जखमी झाले आहेत. चालक प्रशांत शिरसाट (३२) किरकोळ जखमी झाले आहेत.

दरम्यान, अपघातानंतर महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, क्यूआरव्ही पथक व महामार्गावरील आपत्कालीन यंत्रणांनी तत्काळ मदतकार्य करत जखमींना १०८ रुग्णवाहिका तसेच समृद्धी महामार्गाच्या रुग्णवाहिकेद्वारे सिन्नर येथील रुग्णालयात (Hospital) दाखल केले. जखमींवर उपचार सुरू असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या साहाय्याने महामार्गावरून हटवून सिन्नर पोलीस ठाण्याच्या (Sinnar Police Station) आवारात लावण्यात आले आहे. या अपघाताची माहिती सिन्नर पोलीस ठाण्यास देण्यात आल्यानंतर अपघाताचा गुन्हा (Case) दाखल करण्यात आला.

ताज्या बातम्या