ओझे| वार्ताहर | Oze
भरधाव वेगातील अज्ञात छोटा हत्ती वाहनाने (Vehicle) पुढे जाणाऱ्या दुचाकीला (Bike) मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार (Killed) झाला आहे.
- Advertisement -
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनकर चंदर चौधरी (वय २४) रा,मोरडा ,पो. माणी, ता. सुरगाणा हा युवक एमएच १५ एचपी ५३७९ या क्रमांकाच्या दुचाकीवरुन खेडगाव पिंपळगाव या राष्ट्रीय महामार्गावरुन (National Highway) मार्गक्रमण करत होता. यावेळी मागून येणाऱ्या भरधाव वेगात आलेल्या छोटा हत्ती वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली.
दरम्यान, या धडकेत दिनकर हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यु (Death) झाला. यानंतर नितीन चौधरी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे




