Friday, January 23, 2026
Homeक्राईमNashik Accident News : अमरधामजवळ मध्यरात्री भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघांची प्रकृती...

Nashik Accident News : अमरधामजवळ मध्यरात्री भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

पंचवटी परिसरातील अमरधामजवळ (Amardham in Panchavati Area) बुधवारी पहाटे अंदाजे २ ते ३ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात (Accident) एकाचा मृत्यू (Death) झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी हे सर्व फर्निचर कामगार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अपघातग्रस्त होंडा सिटी (गाडी क्र.एमएच ०१ बीयू ३११२) ही कार तपोवनकडून पंचवटीकडे जात असताना चालकाचा ताबा सुटून रस्त्यालगत असलेल्या निंबाच्या झाडाला धडक दिल्याने ही दुर्घटना घडली.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, सदर अपघातात (Accident) सुरज संजय यादव याचा मृत्यू झाला असून राजेश हरी ठाकूर, प्रियांशू मोहित विश्वकर्मा आणि सतीश संतोष यादव हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ही धडक इतकी जबरदस्त होती की, कारचे दोन्ही एअरबॅग उडाले. तसेच सीएनजी टँकही मागील सीटवर येऊन पडला. तर वाहनाचा पुढील भाग अक्षरशः चक्काचूर झाला असून, गाडी ओळखू न येण्याजोग अवस्थेत दिसत होती.

YouTube video player

दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी अपघाताच्या वेळी वाहनाचा वेग सुमारे ११० किमी प्रतितास असल्याचा दावा केला आहे. दुर्घटनेनंतर अधिक चिंताजनक बाब म्हणजे वाहन पूर्णपणे फुटलेले असतानाही सीएनजी गॅसची गळती सुरू असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळे घटनास्थळी काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. तर पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

ताज्या बातम्या

महाड

मोठी बातमी! महाड राड्याप्रकरणी विकास गोगावले अखेर पोलिसांसमोर शरण, अटकपूर्व जामीनावर...

0
मुंबई | Mumbaiरायगड जिल्ह्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे मंत्री आणि शिंदेसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनी अखेर...