Wednesday, February 4, 2026
HomeनाशिकNashik Accident News : पेठच्या कुंभाळे फाट्यानजीक पुन्हा अपघात; दोघांचा मृत्यू, २...

Nashik Accident News : पेठच्या कुंभाळे फाट्यानजीक पुन्हा अपघात; दोघांचा मृत्यू, २ गंभीर जखमी

पेठ | Peth | वार्ताहर

दोन दिवसांपूर्वी ज्या जागेवर मोटरसायकल अपघातात (Bike) २ तरुणांचा मृत्यु (Youth) झाला होता. त्याच ठिकाणाजवळ आज (गुरुवार) पुन्हा दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात (Accident) घडला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू , तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, गुजरातमधील (Gujarat) वावर ता. कापराडा, जि.बलसाड येथील रामदास शिवराम शवरा (वय ३८) हे आपली मोटरसायकल क्रमांक जीजे १५ डीएल ८१२२ ने पेठकडे (Peth) येत होते. यावेळी पेठकडून गुजरातकडे जाणारी विना क्रमांकाची पल्सर गाडी घेऊन हिरामण लक्ष्मण बोरसे (वय ४२) यांनी समोरून येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली.

YouTube video player

दरम्यान, या धडकेत रामदास शवरा व हिरामण बोरसे हे घटनास्थळी जागीच मृत्युमुखी पडले. तर या मोटरसायकल वरून प्रवास करणारे नितीन मन्या शवरा व गणेश सोमा गाढवे हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी शिवराम नानू शवरा यांच्या फिर्यादीवरून पेठ पोलीस ठाण्यात (Peth Police Station) नोंद करण्यात आली .

ताज्या बातम्या

ममता

SIR: “निवडणूक आयोग हे व्हॉट्सॲप आयोगासारखे, फक्त नावे हटवण्यासाठी…”, ममता बॅनर्जींचा...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiपश्चिम बंगालमधील स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) खटल्याची बुधवारी सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. या खटल्यावरून राजकीय...