Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik Accident News : मोटारसायकल अपघातात तरुणाचा मृत्यू

Nashik Accident News : मोटारसायकल अपघातात तरुणाचा मृत्यू

वावी | वार्ताहर | Vavi

वावी (Vavi) येथील भैरवनाथ नगरमध्ये राहणाऱ्या एका बावीस वर्षीय तरुणाचा (Youth) सिन्नर शिर्डी हायवेवर स्वतःच्याच मोटारसायकल वरून घसरून झालेल्या अपघातात (Accident) मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा :   Nashik Rain Update : जिल्ह्यात पावसाची ‘जोर’धार सुरूच; गोदावरीला यंदाच्या मोसमातील दुसरा पूर

याबाबत अधिक माहिती अशी की, वृषभ बैजनाथ प्रजापती (२२) असे अपघातात मृत्यू (Death) झालेल्या तरुणाचे नाव आहे. शनिवार (दि.२४) रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे आपल्या घरून कामगारांचा जेवणाचा डबा देण्यासाठी निघाला होता, यावेळी रस्त्यातच पावसामुळे (Rain) मोटारसायकल स्लिप होऊन तो डिव्हाइडरवर आदळल्याने त्याचा मृत्यू झाला.

हे देखील वाचा :  Nashik Rain Update : मनमाड, येवला, चांदवडसह निफाडकरांना दिलासा

यानंतर वृषभ यास पुढील उपचारासाठी सिन्नर (Sinnar) येथील एका खाजगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर त्यास शेवविच्छेदनासाठी नाशिक येथे नेण्यात आले व रात्री उशिरा त्यास आपल्या मुळगावी अयोध्या उत्तरप्रदेश येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले.

हे देखील वाचा : Nashik News : हतगड येथे पाच दिवसांपासून चक्का जाम आंदोलन; वाहतूक ठप्प, प्रवाशांचे भर पावसात हाल

दरम्यान, ऋषभ यास आणखी तीन भावंडे असून तो सर्वात लहान होता. ऋषभच्या वडिलांचा गेल्या वीस वर्षापासून लाकडाचा वावी (Vavi) येथे व्यवसाय असून त्याच्या अपघाती निधनामुळे वावीसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...