Tuesday, February 3, 2026
HomeनाशिकNashik Accident : नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील बेझेफाटा येथे भीषण अपघात; अंबडचे दोन तरुण...

Nashik Accident : नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील बेझेफाटा येथे भीषण अपघात; अंबडचे दोन तरुण ठार

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

नाशिक- त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील (Nashik-Trimbakeshwar Road) बेझेफाटा येथे काल (मंगळवारी)रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास चारचाकीचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली. या अपघातात अंबड येथील दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे अंबड गावावर शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, पंकज दिलीप दातीर (वय ३१) व अभिषेक ज्ञानेश्वर घुले (३०) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. त्यांची कार रस्त्यावरील दुभाजकाला धडकल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांवर आज सकाळी (बुधवारी) अंबड येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आले.

YouTube video player

दरम्यान, मयत पंकज हा अंबड येथील औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत अधिकारी होता. त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. तर मयत अभिषेक याच्या पश्चात आई, वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे. या युवकांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

Nashik Mayor : भाजपकडून महापौर, उपमहापौर पदासाठी नावे निश्चित झालेल्या आडके...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक महापालिकेच्या महापौरपदासाठी माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेविका हिमगौरी आडके (Himgauri Adke) आणि उपमहापौर पदासाठी माजी आमदार बाळसाहेब सानप...