लासलगाव | वार्ताहर | Lasalgaon
मुंबई (Mumbai) येथून कांदा (Onion) भरण्यासाठी आलेल्या कंटेनर आणि दुचाकीचा येथील बायपास रोडवर एडीएफ जवळ झालेल्या भीषण अपघातात (Accident) दुचाकीवरील एका महिलेचा जागीच मृत्यू (Death) झाला. तर दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गायत्री हेमंत घायाळ (रा. पाबळवाडी, ता. निफाड) असे मृत महिलेचे नाव आहे. मुंबईहून कांदा भरण्यासाठी आलेला कंटेनर क्रमांक एमएच ४६ सीएल ४०३० हा वळत असताना दुचाकी क्रमांक एमएच १५ ईएम ९७१२ सरळ जात असतांना पुढील भागाला जोरदार धडक झाली. यात दुचाकीवरील महिला धडक बसल्याने फेकली गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, या अपघातात दुचाकी चालविणारा तुषार भाऊसाहेब पानगव्हाणे (वय २५) हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात (Nashik Civil Hospital) उपचार सुरू आहेत. या अपघातप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास लासलगाव पोलीस करत आहेत.




