Tuesday, July 2, 2024
Homeनाशिकनाशिकच्या विमानसेवेची भरारी; गत वर्षात अडीच लाख प्रवाशांनी घेतला लाभ

नाशिकच्या विमानसेवेची भरारी; गत वर्षात अडीच लाख प्रवाशांनी घेतला लाभ

कृषी उडाणची तयारी अंतिम टप्प्यात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

नाशिकच्या विमानसेवेला (Airline) उडाणने गती दिली असली तरी गेल्या काही वर्षांमध्ये नाशिक विमानसेवा (Nashik Airline) ही स्वयंपूर्ण झाल्याचे दिसून येत आहे. दररोज किमान एक हजार प्रवासी विमानसेवेचा लाभ घेत आहेत. आणखी विविध शहरांना जोडण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातच आता नाशिकमधून कृषी उडाण (Agricultural Flight) तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

इंडिगो विमान कंपनीने (Indigo Airlines) नाशिकच्या विमानसेवेची कमान हाती घेत सेवा द्यायला सुरुवात केली आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात सुमारे २ लाख २५ हजार प्रवाशांनी विभाग सेवेचा लाभ घेतला आहे. नाशिक विमानतळावरून (Nashik Airport) दररोज किमान एक हजार प्रवाशांचे येणे-जाणे सुरू आहे. अहमदाबाद शहरासाठी सुरुवातीला एक विमानसेवा सुरू करण्यात आली होती. प्रवाशांची मागणी व गर्दी लक्षात घेता अहमदाबादसाठी दोन विमानसेवा सुरू झाल्या होत्या. मात्र उडाण योजनेअंतर्गत विमानतळावर औरंगाबाद अहमदाबादसाठीची एक विमान सेवा वळवण्यात आल्याने नाशिकची एक विमानसेवा बंद करण्यात आली असल्याने प्रवाशांची अडचण निर्माण झाली आहे.

दरम्यान, नाशिक शहर हे पर्यटनासाठी, धार्मिक दर्शनासाठी व उद्योगांसाठी जितके प्रसिद्ध आहे तितकेच ते कृषी उत्पादनासाठी देखील महत्त्वाचे शहर आहे. देशासह जगभरात येथून मोठ्या प्रमाणात शेती उत्पादने (Agricultural Products) पुरवली जातात. त्यादृष्टीने नाशिकला कृषी उडाण या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहे. सवलतीच्या दरात कृषी उत्पादने जगभरात पाठवणे त्यामुळे शक्य होणार आहे. या योजनेची तत्त्वतः मान्यता, त्यासाठी लागणाऱ्या सुविधांची उभारणी करण्यात आलेली आहे. लवकरच त्यावरही शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

नाशिकला सर्वाधिक पसंती

नाशिकला आतापर्यंत सर्वच विमान कंपन्यांनी आपली विमानसेवा देण्याला पसंती दिलेली होती. त्यात एअर डेक्कन, स्टार एयर, टू जेट, एअर अलाईन्स, जेट, स्टार एअर, जेट एअरवेज अशा विविध कंपन्यांनी आपल्या विमानसेवा सुरू केल्या होत्या, त्यातील एअरलाईन्स आणि स्टार एअरची उडाण योजनेअंतर्गत विमानसेवा असल्याने त्या योजनेचा करार संपताच विमानसेवा बंद केल्या.

दिल्ली विमानसेवा हाऊसफुल्ल

नाशिक-दिल्लीसाठी १८० प्रवासी क्षमता असलेली थेट विमानसेवा ही जवळ जवळ ९० टक्के प्रवासी घेऊन जात आहे. यासोबतच नाशिकमधून नाशवंत शेती उत्पादने जसे फुले, द्राक्ष, डाळिंब यांची वाहतूकही गतीने होऊ शकत असल्याने प्रवासी सेवेसोबतच कार्गो सेवाचेही बळ विमान कंपनीला मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा प्रयत्न

नाशिक विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी पूर्ण झालेली असून, त्यासाठी लागणारी यंत्रणाही उभारण्यात आलेल्या आहेत. मात्र यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांचे ना हरकत पत्र मिळणे अपेक्षित आहे. निवडणुका संपल्या आहेत. विविध खात्यांचे पदभार वाटप झाले आहेत. त्यामुळे ना हरकत प्रमाणपत्राचा प्रश्नही लवकर मार्गी लागण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या