नाशिक | Nashik
राज्याच्या विधानसभा निवडणूकीचा निकाल आज जाहीर होत असून सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस सुरवात झाली आहे.यात नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघातून इव्हिएम मतमोजणी मंत्री छगन भुजबळ पिछाडीवर आहेत. यामध्ये दुसऱ्या फेरीत माणिकराव शिंदे १३०० मतांनी आघाडीवर आहेत. तर मालेगाव बाह्य मतदारसंघातून दुसऱ्या फेरी अखेर दादा भुसे हे ८ हजार ७१३ मतांनी आघाडीवर आहेत. तसेच मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार रशीद शेख ३ हजार ५४० मतांनी आघाडीवर आहेत.
याशिवाय नांदगाव मतदारसंघातून सुहास कांदे यांना पहिल्या फेरीत ६ हजार ५१५ मते, समीर भुजबळ यांना २ हजार ५८३, डॉ. रोहन बोरसे यांना १९४ आणि गणेश धात्रक यांना २५ मते मिळाली आहेत. तर बागलाणमधून पहिल्या फेरीत भाजपचे दिलीप बोरसे ३ हजार ८२२ मतांनी आघाडीवर आहेत. तसेच दीपिका चव्हाण यांना २ हजार ७५९ मते मिळाली आहेत. तर देवळातून अजित पवार गटाच्या सरोज अहिरे आघाडीवर आहेत नाशिक मध्यतून भाजपच्या देवयानी फरांदे, पूर्वतून राहुल ढिकले, पश्चिमतून सीमा हिरे आघाडीवर आहेत.