नाशिक | Nashik
राज्याच्या विधानसभा निवडणूकीचा निकाल आज जाहीर होत असून सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस सुरुवात झाली आहे. यात नाशिक जिल्ह्यातील नाशिक पूर्व मतदारसंघातून राहुल ढिकले आघाडीवर आहेत. तर सिन्नर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे सहाव्या फेरी अखेर ६ हजार ७०० मतांनी आघाडीवर आहेत. तर मालेगाव बाह्य मतदारसंघातून शिवसेनेचे दादा भुसे चौथ्या फेरी अखेर १७ हजार ४९० मतांनी आघाडीवर आहेत.
तर बागलाण विधानसभा मतदारसंघातून पहिल्या फेरी अखेर भाजपचे दिलीप बोरसे १० हजार ६८६ मतांनी आघाडीवर आहेत.तर चांदवमधून भाजपचे डॉ राहुल आहेर ५ हजार ३१३ मतांनी आघाडीवर आहेत. तसेच निफाडमधून चौथ्या फेरी अखेर अजित पवार गटाचे दिलीप बनकर १३ हजार १७७ मतांनी आघाडीवर आहेत. तर दिंडोरीतून पाचव्या फेरी अखेर ७ हजार ४९९ मतांनी आघाडीवर आहेत. तर इगतपुरीतून हिरामण खोसकर यांना चौथ्या फेरीत एकूण ३९ हजार ५५४ मते मिळाली आहेत. तसेच कळवणमध्ये दुसऱ्या फेरी अखेर ९९ मतांनी जीवा पांडू गवित आघाडीवर आहेत. तर तिसऱ्या फेरी नतंर सुहास कांदे साडे अकरा हजार मतांनी आघाडीवर आहेत. याशिवाय तिसऱ्या फेरी अखेर दिनकर पाटील ५ हजार ३०६, सुधाकर बडगुजर १ हजार ५३२ आणि सीमा हिरे यांना ३ हजार ४७९ मते मिळाली आहेत. तसेच देवळालीतून चौथ्या फेरी अखेर अहिरराव यांना २ हजार ९८६, सरोज अहिरे ४ हजार ७७४ आणि योगेश घोलप यांना १ हजार ७८७ मते मिळाली आहेत.