Thursday, February 5, 2026
HomeनाशिकNashik Assembly Election 2024 : दिंडोरीतून नरहरी झिरवाळ तर येवल्यातून छगन भुजबळ...

Nashik Assembly Election 2024 : दिंडोरीतून नरहरी झिरवाळ तर येवल्यातून छगन भुजबळ विजयी

नाशिक | Nashik

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. यात नाशिक जिल्ह्यातील १५ पैकी बऱ्याच मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच काही वेळापूर्वी नाशिक जिल्ह्यातील पहिला निकाल हाती आला होता. त्यात अजित पवार गटाचे निफाडचे उमेदवार दिलीप बनकर विजयी झाले होते. त्यानंतर आता दुसरा आणि तिसरा निकाल हाती आला असून दिंडोरीतून नरहरी झिरवाळ व येवल्यातून छगन भुजबळ विजयी झाले आहेत.

- Advertisement -

नरहरी झिरवाळ ३२ व्या फेरी अखेर ४५ हजार २०१ मतांनी विजयी झाले आहेत. तर येवल्यातून छगन भुजबळ विजयी झाली असून त्यांच्या विजयाची औपचारिक घोषणा बाकी आहे.

YouTube video player

ताज्या बातम्या

Nashik Crime : यूट्यूब निवेदकावर खंडणीचा गुन्हा

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik यूट्यूब व सोशल मीडियाच्या (You Tube and Social Media) माध्यमातून बदनामीकारक व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत तीन लाख रुपयांची खंडणी...