Friday, July 24, 2026
Homeक्राईमNashik Crime : यूट्यूब निवेदकावर खंडणीचा गुन्हा

Nashik Crime : यूट्यूब निवेदकावर खंडणीचा गुन्हा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

यूट्यूब व सोशल मीडियाच्या (You Tube and Social Media) माध्यमातून बदनामीकारक व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत तीन लाख रुपयांची खंडणी (Extortion) मागितल्याप्रकरणी आवामी विकास पार्टीचा पदाधिकारी व युट्यूब वार्ताहर संशयित सर्फराज पठाण व अल्ताफ शेख यांच्याविरोधात नाशिकमधील भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

या प्रकरणी सना शकील तांबोळी (वय २८, रा. काझीपुरा, जुने नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे पती शकील अमीर तांबोळी हे नाशिक शहरात (Nashik City) स्टेशनरीचा व्यवसाय करतात. फिर्यादीनुसार, सर्फराज पठाण याने युट्यूब व सोशल मीडियावरून त्यांच्या पतीविरोधात खोटे व बदनामीकारक व्हिडिओ तयार करून ते प्रसारित केल्याचा आरोप आहे. या व्हिडिओंमुळे फिर्यादी व त्यांच्या पतीला मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे नमूद आहे.

तसेच २२ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी सुमारे ३ ते ३.३० वाजण्याच्या सुमारास सर्फराज पठाण व त्याचा सहकारी अल्ताफ शेख हे फिर्यादीच्या दुकानात (Shop) आले. त्यावेळी “जर पैसे दिले नाहीत तर अधिक बदनामीकारक व्हिडिओ प्रसारित करू,” अशी धमकी देत तीन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे नमूद केले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी सर्फराज पठाण व अल्ताफ शेख यांच्याविरोधात खंडणी व संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला असून सर्फराजवर यापूर्वी विविध स्वरुपाचे गुन्हे नोंद आहेत.

ताज्या बातम्या

संपादकीय : २४ जुलै २०२६ – युवकांचा आक्रोश अन् राजकारणाचा बनाव

0
वैद्यकीय प्रवेशाच्या नीट परीक्षा पेपरफुटीचे पडसाद निकाल किंवा न्यायालयाच्या कक्षांपुरते मर्यादित न राहता, थेट देशातील रस्त्यारस्त्यांवर उमटले आहेत. लाखो तरुणांचे भविष्य अंधारात ढकलले गेल्याच्या...