नाशिक | Nashik
आज (बुधवार) सकाळी ७ वाजेपासून मतदानास (Voting) सुरुवात झाली असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार आहे. सकाळपासून मतदानासाठी मतदान केंद्राच्या बाहेर महिला व पुरुष मतदारांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. आज सकाळी नऊ वाजता ६.९३ टक्के,११ वाजता १८.८२ टक्के तर दुपारी एक वाजेपर्यंत ३२.३५ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत नाशिक जिल्ह्यात ४६.१८ टक्के इतके मतदान झाले आहे.
यात सर्वात कमी मतदान ३८.९४ टक्के नाशिक पूर्व मतदारसंघात झाले आहे. तर सर्वाधिक मतदान दिंडोरीत ५९.३३ टक्के मतदान झाले आहेत. तर नांदगाव मतदारसंघात ४२.९६ टक्के, मालेगाव मध्य ४०. टक्के, मालेगाव बाह्यमध्ये ४२.००टक्के, बागलाण ३९.०४ टक्के, कळवण ५६.०३ टक्के, चांदवड ५१.०६ टक्के, येवला ५२.७२ टक्के, सिन्नर ५२.०० टक्के, निफाड ४७.९६ टक्के,नाशिक मध्य ४२.५६ टक्के, नाशिक पश्चिम ४०.५१ टक्के, देवळाली ४१.०२ टक्के,इगतपुरी ५२.६४ टक्के इतके मतदान झाले असून जिल्ह्यात एकूण ४६.१८ टक्के मतदान दुपारी ०३ वाजेपर्यंत झाले आहे.
दुपारी एक वाजेपर्यंत झाले होते ३२.३५ टक्के मतदान
दिंडोरी मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत ४३.२९ तर सर्वात कमी २७.३४ टक्के बागलाण मतदारसंघात झाले होते. तर नांदगाव मतदारसंघात ३०.१६ टक्के, मालेगाव मध्य ३५.८२ टक्के, मालेगाव बाह्यमध्ये २७.७६ टक्के, कळवण ३६.१५ टक्के, चांदवड ३४.१९ टक्के, येवला ३५.८६ टक्के, सिन्नर ३६.४० टक्के, निफाड ३१.८० टक्के, नाशिक पूर्व २८.२१ टक्के, नाशिक मध्य ३०.२७ टक्के, नाशिक पश्चिम २८.३४ टक्के, देवळाली २८.१९ टक्के,इगतपुरी ३४.९८ टक्के इतके मतदान झाले असून जिल्ह्यात एकूण ३२.३५ टक्के मतदान दुपरी ०१ वाजेपर्यंत झाले आहे.
सकाळी ११ वाजेपर्यंत १८.८२ टक्के मतदान
नांदगाव मतदारसंघात १६.४६, मालेगाव मध्य मतदारसंघात २२.७६ , मालेगाव बाह्यमध्ये १७.३७, बागलाण १८.२३, कळवण १८.२४, चांदवड २१.३०, येवला २०.९२, सिन्नर २१.१०, निफाड १७.६४, दिंडोरी २६.४१, नाशिक पूर्व १३.९०, नाशिक मध्य १८.४२, नाशिक पश्चिम १६.३२, देवळाली १५.०१ आणि इगतपुरीत २०.४३ असे एकूण १८.८२ टक्के मतदान नाशिक जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत झाले होते.
सकाळी ९ वाजेपर्यंत जिल्ह्यात ६.९३ टक्के मतदान
नांदगाव मतदारसंघात ४.९२, मालेगाव मध्य मतदारसंघात ९.९८, मालेगाव बाह्यमध्ये ६.३०, बागलाण ६.११, कळवण ८.९१, चांदवड ६.४९, येवला ६.५८, सिन्नर ८.०९, निफाड ५.४०, दिंडोरी ९.७१, नाशिक पूर्व ६.४३, नाशिक मध्य ७.५५, नाशिक पश्चिम ६.२५, देवळाली ४.४२ आणि इगतपुरीत ६.८८ असे एकूण ६.९३ टक्के मतदान नाशिक जिल्ह्यात सकाळी ९ वाजेपर्यंत झाले होते.
असा आहे पोलीस बंदोबस्त
पोलीस आयुक्त, चार उपायुक्त, सात सहाय्यक आयुक्त
५४ पोलीस निरीक्षक, ५३ सहायक पोलीस निरीक्षक
८१ पोलीस उपनिरीक्षक, २ हजार ३१७ पोलीस अंमलदार
२ बॉम्बशोधक व नाशक पथक, ३ जलद प्रतिसाद पथक
४५० महाराष्ट्र होमगार्ड, ५५० गुजरात होमगार्ड, १३० नागरी संरक्षण स्वयंसेवक
पोलीस आयुक्तांसोबत १६ अधिकारी-कर्मचाऱ्यांची ‘स्ट्रयकिंग फोर्स’
सर्व उपायुक्त व सहायक आयुक्तांसोबत चार-सहा अंमलदारांची ‘स्ट्रायकिंग फोर्स’
‘स्ट्रॉगरूम’ बाहेर स्थानिक पोलीस, सीआरपीएफ व एसआरपीएफची प्लाटून
२९ बीटमार्शल व ३५ गस्ती पथके
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
.