नाशिक | Nashik
भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार (Sunil Kedar) यांनी पक्षांतर्गत कलहामुळे तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.त्यानंतर आता अवघ्या काही तासांत केदार यांनी यु-टर्न घेत राजीनामा मागे घेतल्याचा खुलासा केला आहे.
यावेळी ‘देशदूत’ शी बोलतांना ते म्हणाले की, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोन आला होता. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत माझ्या मागण्यांबाबत चर्चा झाल्याचे सांगितले. त्यामुळे माझा राजीनामा मागे घेत आहे, असे सुनील केदार यांनी सांगितले.
हे देखील वाचा : Nashik BJP Politics : भाजप शहराध्यक्ष सुनील केदारांचा तडकाफडकी राजीनामा
काल (मंगळवारी) भाजपकडून महापौरपदासाठी हिमगौरी आहेर-आडके आणि उपमहापौरपदासाठी मछिंद्र सानप यांचे नाव निश्चित झाले होते. त्यावरून सुनील केदार नाराज असल्याची चर्चा होती. काही दिवसांपूर्वी सुनील केदार यांनी शिवसेनेला सत्तेत सोबत घेण्यासाठी देखील प्रस्ताव दिला होता.या प्रस्तावनानंतर आम्हाला सत्तेत कुणाची गरज नाही असे वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केले होते.
दरम्यान, या सगळ्या घडामोडीनंतर सुनील केदार यांनी प्रदेश कामिटीकडे आपल्या पदाचा राजीनामा पाठवला होता. तसेच नवीन शहाराध्यक्ष मिळेपर्यंत कामकाज बघणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, आता केदार यांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे.
हे देखील वाचा : Nashik Fire News : सिन्नरच्या माळेगाव एमआयडीसीतील कारखान्याला भीषण आग
ज्या कारणांमुळे मी भाजप नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.त्या विषयांवर प्रदेश भाजप बरोबर माझी सविस्तरपणे चर्चा झाली आहे.माझे समाधान झाले आहे.प्रदेश भाजपच्या सुचनेनुसार मी माझा राजीनामा मागे घेतला आहे.
सुनील केदार अध्यक्ष – भाजप नाशिक महानगर जिल्हा





