Tuesday, February 3, 2026
HomeनाशिकNashik BJP Politics : अखेर ठरलं! महापालिकेत 'हा' नगरसेवक सांभाळणार भाजपची धुरा

Nashik BJP Politics : अखेर ठरलं! महापालिकेत ‘हा’ नगरसेवक सांभाळणार भाजपची धुरा

नाशिक | Nashik

महापालिका निवडणुकीत (Municipal Corporation) भाजपने (BJP) ७२ जागांवर विजय मिळवत बहुमताचा आकडा पार केला. तर शिंदे सेनेला २६, ठाकरेंच्या शिवसेनेला (Thackeray Shivsena) १५, काँग्रेसला ०३, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ०४ मनसेला एक आणि अपक्ष उमेदवाराला एका जागेवर समाधान मानावे लागले. भाजपकडून महापालिकेसाठी ‘शंभर प्लस’चा नारा देण्यात आला होता. परंतु, त्यांची गाडी ७२ वरच अडकली. त्यामुळे त्यांना शंभरचा आकडा गाठता आला नाही.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Election Results 2026 : प्रभाग निहाय पक्षीय विजयी उमेदवारांची यादी; वाचा सविस्तर

YouTube video player

नाशिक महापालिकेचे महापौरपदाचे आरक्षण (Mayor) सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. भाजपकडे बहुमताचा आकडा असल्याने त्यांचा महापौर होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. यानंतर महापौरपदासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांनी राजकीय क्लुप्त्यांचा वापर करत नेतेमंडळींच्या भेटीगाठी, संपर्क आणि समीकरणे यांची आकडेमोड करत रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. मात्र प्रत्यक्षात महापौरपदाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) हे घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे यंत्या एक ते दोन दिवसांत महापौर पदाच्या उमेदवाराचे नाव निश्चित होईल.

हे देखील वाचा : Nashik Politics : महापौर पदासाठी देव पाण्यात ठेवलेल्यांचा भ्रमनिरास; ‘या’ बड्या इच्छुकांची संधी हुकली

त्याआधी भाजपने महापालिकेसाठी आपला गटनेता (Gropup Leder) निवडला आहे. प्रभाग क्रमांक ३० मधून दुसऱ्यांदा निवडून आलेले ॲड. श्याम बडोदे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला. यानंतर त्यांची भाजपने महापालिकेत गटनेता म्हणून निवड केली आहे. त्यानंतर उद्या (दि.२८) रोजी भाजपकडून नाशिक महापालिकेसाठी (Nashik NMC) गट नोंदणी प्रक्रिया विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात केली जाणार आहे.

हे देखील वाचा :  Nashik Mayor Reservation: आरक्षण सोडत जाहीर होताच महापौरपदासाठी ‘ही’ नावे चर्चेत; भाजपकडून कुणाला मिळणार संधी?

दरम्यान, गट नोंदणी प्रक्रिया पार पडल्यानंतर अधिकृतरीत्या सत्ता स्थापनेची प्रक्रिया गतिमान होणार आहे. भाजपकडून महापौरपदासाठी आमदार राहुल आहेर यांच्या भगिनी आणि माजी स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके या महापौरपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. त्यांच्याकडे राजकीय वारसा, प्रशासकीय अनुभव आणि संघटनात्मक ताकद असल्यामुळे त्यांचे नाव पहिल्या नंबरवर आहे. तसेच स्वाती भामरे, दिपाली गीते, डॉ. योगिता हिरे, माधुरी बोलकर,चंद्रकला धुमाळ यांचीही नावे महापौरपदासाठी शर्यीतीत आहेत. त्यामुळे आता महापौरपदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडते, याकडे संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागून आहे.

गटनेत्याचे नेमके काम काय?

महापालिकेच्या कामकाजात भाग घेण्यासाठी प्रत्येक पक्षाचा गटनेता हा महत्त्वाची भूमिका बजावत असतो. किमान सहा नगरसेवक असलेल्या पक्षाला गटनेता बनण्याचा मान मिळतो. त्यामुळे सहा नगरसेवकांच्या गणसंख्येनुसार त्यांचा किमान एक सदस्य हा वैधानिक तथा विशेष समित्यांवर निवड होते. तसेच या गटनेत्याला महापौरांच्या अध्यक्षतेखालील गटनेत्यांच्या सभेत स्थान मिळते आणि कोणत्याही विषयासंदर्भात आयुक्त महापौरांच्या वतीने बैठक बोलावून त्यावर प्राथमिक माहितीसह त्याला तत्वत: मंजुरी घेत असतात. त्यामुळे महापालिकेत महापौरांची निवड झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाचा गटनेता हा सभागृह नेता म्हणून कामकाज पाहतो तर विरोधी पक्षांचा गटनेता हा विरोधी पक्षनेता म्हणून कामकाज पाहत असतो.

हे देखील वाचा : Mayor Reservation : नाशिक, मालेगाव, धुळे महानगरपालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव; वाचा कोणत्या महापालिकेत कुठले आरक्षण?

ताज्या बातम्या

टॅरिफ

India-US Tariff: ग्रेट डील! अमेरिकन टॅरिफवरुन भारताला मोठा दिलासा; २५ टक्क्यांवरुन...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांचे ‘अमेरिका फर्स्ट’ हे धोरण राबवण्यासाठी भारतावर तब्बल 25 टक्के टॅरिफ 1 ऑगस्ट 2025...