Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik BJP Politics : शहराध्यक्ष सुनील केदारांना भाजपच्या निष्ठावंतांनी दिले गाजर भेट

Nashik BJP Politics : शहराध्यक्ष सुनील केदारांना भाजपच्या निष्ठावंतांनी दिले गाजर भेट

नाशिकरोड | Nashik Road

महापालिका निवडणुकीत (NMC Election) इतर पक्षांतून आलेल्या आयात उमेदवारांना उमेदवारी दिल्याने नाशिक भाजपातील (Nashik BJP) निष्ठावंत कार्यकर्त्यांचा उद्रेक झाला आहे. या उद्रेकाला आमदारांसह शहराध्यक्ष सुनील केदार यांना सामोरे जावे लागत आहेत. आज दुपारी नाशिकरोड येथील भाजपच्या कार्यालयाबाहेर निष्ठावंत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून शहराध्यक्षांना घेराव घालत उमेदवारी का दिली नाही? असे म्हणत जाब विचारला होता. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik BJP Politics : नाशिकरोडच्या भाजप कार्यालयाबाहेर आमदार ढिकलेंविरोधात निष्ठावंतांची घोषणाबाजी; शहराध्यक्षांना घातला घेराव, पोलिसांचा फौजफाटा तैनात

YouTube video player

यानंतर भाजप कार्यालयाला कुलूप लावण्यात आले होते. तसेच पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. त्यानंतर याच निष्ठावंत कार्यकर्त्यांनी भाजपने उमेदवारीचे गाजर दाखवले म्हणून शहराध्यक्ष सुनील केदार यांना तेथून निघताना गाजर भेट देत आपला संताप व्यक्त केला. यावेळी पोलीस बंदोबस्तात सुनील केदार भाजपा कार्यालयाच्या बाहेर पडताना बघायला मिळाले.

हे देखील वाचा : Nashik MC Election : छाननीत २७७ अर्ज बाद; २,०७९ अर्ज वैध, माघारीनंतर होणार चित्र स्पष्ट

दरम्यान, काल (बुधवारी) प्रभाग क्रमांक २९ मधून उमेदवारी न मिळाल्याने बाळासाहेब घुगे या भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याने आमदार सीमा हिरे यांच्याविरोधात घोषणाबाजी करत स्वत:चे तोंड झोडून घेतले होते. या घटनेनंतर आज (गुरुवारी) नाशिकरोडच्या निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर आमदार राहुल ढिकले (MLA Rahul Dhikale) यांच्याविरोधात घोषणाबाजी करत आपली नाराजी व्यक्त केली.

ताज्या बातम्या

Nashik Politics : नाशकात मोठी राजकीय घडामोड; दोन माजी महापौर करणार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) धामधुमीत शहरात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी भाजपमध्ये (BJP) असलेले नाशिकचे दोन माजी...