Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik BJP Politics : आमदार फरांदेंचा पांडे, वाघ, खैरेंच्या पक्षप्रवेशाला कडाडून विरोध; भाजपमधील...

Nashik BJP Politics : आमदार फरांदेंचा पांडे, वाघ, खैरेंच्या पक्षप्रवेशाला कडाडून विरोध; भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर

नाशिक | Nashik

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत नाशकात ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, माजी महापौर विनायक पांडे यांच्यासह यतीन वाघ,माजी नगरसेवक संजय चव्हाण आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक शाहू खैरे हे आज (गुरुवारी) भाजपचे संकटमोचक आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत. मात्र, या पक्षप्रवेशाला निवडणूक प्रमुख आणि नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी कडाडून विरोध केला आहे.

- Advertisement -

आमदार फरांदे यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर एक पोस्ट केली असून, त्यामध्ये “प्रभाग क्रमांक १३ मध्ये होणाऱ्या आजच्या प्रवेशाला माझा स्पष्ट विरोध आहे. तसेच प्रस्थापितांच्या विरोधात ठामपणे लढा देणाऱ्या हिंदुत्ववादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मी खंबीरपणे पाठीशी आहे. सदर विषयाबाबत निवडणूक प्रमुख म्हणून मला कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाही”, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. फरांदे यांनी या पक्षप्रवेशाला विरोध केल्यामुळे आता नाशिकमधील भाजपची अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आली आहे.

YouTube video player

हे देखील वाचा : Nashik Politics : ठाकरेंची शिवसेना, काँग्रेसला मोठा धक्का; माजी महापौर विनायक पाडेंसह ‘हे’ नेते करणार भाजपमध्ये प्रवेश

पांडे यांच्यासोबत पक्षप्रवेश करणारे सर्वजण प्रभाग तेरा मधून इच्छुक असून पॅनल निवडून आणण्याच्या दृष्टीने भाजपचे प्रयत्न सुरू आहे. याच प्रभागातून शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांचे पुतणे बबलू शेलार यांनी चार दिवसांपूर्वीच आमदार देवयानी फरांदे यांच्यां माध्यमातून भाजपमध्ये प्रवेश केला होता. उमेदवारीच्या अपेक्षेने हा पक्षप्रवेश असल्याचे बोलले जात होते. यानंतर आज माजी महापौर विनायक पांडे यांच्यासह पक्षप्रवेश करणाऱ्यांना आमदार फरांदे यांनी विरोध दर्शविला आहे.

दरम्यान, माध्यमांशी बोलतांना विनायक पांडे यांनी “मागच्या निवडणुकीत तिकिटाच्या वेळी माझ्या मुलाचे तिकीट कापले. आता पुन्हा मुलाच्या उमेदवारीची मागणी केली होती. पंरतु, त्यांच्याकडून सूनबाईला निवडणुकीत उतरविण्यास सांगण्यात आले. त्यादृष्टीने आम्ही सूनबाईला निवडणुकीत उतरवले. आता आम्ही मनसे आणि शिवसेनेचा सुफडा साफ करणार आहोत. संजय राऊत यांच्यासोबत मी फोनवर चर्चा केली, पण त्यांनी उमेदवारीबाबत काही ठोस सांगितले नाही. तरुण पिढीला आता पुढे नाही आणायचे तर मग कधी? माझी पक्षातील कोणावरही नाराजी नाही. मात्र, आज आम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

काल विजयी जल्लोष आणि आज भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल (बुधवारी) मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली. यामुळे संपूर्ण राज्यात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला होता. यात नाशिकमध्ये देखील मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला होता. काल (बुधवारी) हा आनंदोत्सव साजरा करतांना ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर विनायक पांडे देखील हजर होते. मात्र आता याच पाडेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्ह्यात एक लाखांहून अधिक लाडक्या बहिणींची अडचण?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रियेने नगर जिल्ह्यातही महिलांची डोकेदुखी वाढवली. त्यातच जानेवारी महिन्यात अनेक पात्र...