Saturday, January 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik BJP Politics : मनपा निवडणूक प्रमुखपदावरून राहुल ढिकलेंना डच्चू; 'त्या व्हिडीओतील...

Nashik BJP Politics : मनपा निवडणूक प्रमुखपदावरून राहुल ढिकलेंना डच्चू; ‘त्या व्हिडीओतील विधान’ भोवल्याची चर्चा!

आमदार देवयानी फरांदे नव्या 'कॅप्टन'

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी (Nashik Municipal Corporation Election) भारतीय जनता पक्षाने मनपा निवडणूक प्रमुखपदी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे (MLA Devyani Pharande) यांची नियुक्ती केली आहे. आ. राहुल ढिकले (MLA Rahul Dhikle) यांना अचानक डच्चू दिल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. या निवडीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे पत्र आ. फरांदे यांना प्राप्त झाले आहे.

- Advertisement -

सध्या राज्यात महानगरपालिका निवडणुकांची (Election) रणधुमाळी सुरू असून, भाजपाकडून प्रत्येक महानगरपालिकेसाठी स्वतंत्र निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात येत आहे. नाशिक महानगरपालिकेसाठी प्रारंभी आमदार ढिकले यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांच्याकडील ही जबाबदारी काढून घेत पक्षातर्फे आमदार फरांदे यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. ढिकले यांच्याकडून हे पद का काढून घेण्यात आले, याबाबत पक्षांतर्गत चर्चेला उधाण आले आहे. निवडीनंतर आमदार फरांदे यांचे पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते व इच्छुकांकडून अभिनंदन होत असून, त्यांना सर्व घटकांना एकत्र घेऊन महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभावीपणे काम करावे, असे निर्देश पत्रामधून देण्यात आले आहेत.

YouTube video player

कालपर्यंत केवळ आ.राहुल ढिकले यांच्या भरवश्यावर बसलेल्यांना आता आ. फरांदे यांच्याकडे उमेदवारीसाठी गळ घालावी लागणार आहे. दुसरीकडे आमदार ढिकले यांनी आपल्या जाहीर भाषणातून मांडी थोपटण्याची भाषा ज्यांच्याबाब्त केली होती, त्यांना आता आपल्याला उमेदवारी मिळण्यास कुठलेही काटे आडवे येणार नाहीत याची खात्री पटणार असून, त्यांना आता आपल्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाल्याने हयेस वाटू लागले आहे. आ. ढिकले यांची निवड झाली तेव्हाच काही जणांच्या भुवया उंचावल्या होत्या. काही माजी नगरसेवक व इच्छुकांनी गोपनीयरित्या नाराजीही व्यक्त केली होती. तपोवन वृक्षतोड प्रकरणातही ढिकले यांच्यावर आरोप केले जात होते. अखेर पक्षाने फरांदे यांना संधी देऊन पक्षांतर्गत नाराजी दूर केली आहे.

रविवारी (दि. १४) रोजी सायंकाळी ५ वाजता मखमलाबाद रोडवरील सहकार महर्षी कै. उत्तमराव ढिकले जॉगिंग ट्रॅक विस्तारीकरण भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी आ. ढिकले यांनी अत्यंत स्फोटक भाषण केले. या सगळ्या भाषणात त्यांचा रोख कोणावर होता हे उपस्थितांपैकी काहींच्या लक्षात आले होते. कार्यक्रम संपून दुसरा दिवस उलटला तरीही आ. ढिकलेंच्या त्या भाषणाचीच चर्चा रंगली होती. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीतील राग अजूनही आ. ढिकले यांच्या काळजात घर करून असल्याचे या भाषणातून स्पष्ट झाले होते. त्यामुळे हे निवडणूक प्रमुखपद गेले असावे, अशी चर्चा आहे. यामुळे आमदार राहुल ढिकले यांच्या समर्थकाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. यामुळे मनपा निवडणुकीवर काही परिणाम होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

ढिकले भाषणात नेमकं काय म्हणाले होते?

गेल्या दोन दिवसांपूर्वीच ढिकले यांनी एका बैठकीत एकाने माझी रॅली अडवली मला वैयक्तिक त्रास दिला, माझ्यावर टिका केली पण आता निवडणूक प्रमुख मीच आहे. १२२ उमेदवार आहेत सगळीकडेच हस्तक्षेप करणार नाही. पण ज्याने मला त्रास दिला त्याला सोडणार नाही, पहिलवान माणूस आहे. पत्त्यात येऊ द्या, नाही त्याला आस्मान दाखवलं तर तालमीतला राहुल ढिकले नाही असे भाषणात म्हटल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यातून त्यांनी आपल्या भाषणातून हा गर्भित इशारा कोणाला दिला असेल याच्यावर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती.

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो-२०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik दैनिक ‘देशदूत’ आयोजित आणि गंगापूर रोड व परिसरातील गृहप्रकल्पांवर आधारित ‘गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ चा दुसरा दिवस नाशिककरांच्या गर्दीने आणि उत्साहाने...