नाशिक | Nashik
शहरातील सातपूर परिसरातील (Satpur Area) महादेवनगरात वृक्षताेडीदरम्यान पेट्राेलचा भडका उडून भीषण स्फोट (Massive Explosion) झाल्याने ६ ते ७ नागरिक भाजल्याची घटना घडली आहे. यात एका लहान बालकाचा देखील समावेश आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे
- Advertisement -
मिळालेल्या माहितीनुसार, महापालिका प्रशासनातर्फे (Municipal Administration) सातपूर येथील महादेवनगर परिसरात (Mahadev Nagar Area) वृक्षतोडीचे काम सुरु होते. यावेळी एक इसम लिंबाच्या झाडाखाली विडी ओढत असताना पेट्रोल उडाल्याने भडका उडाला. यात एका बालकासह ६ ते ७ जण भाजले.
दरम्यान, त्यानंतर जखमींना तात्काळ पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात (Nashik Civil Hospital) दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलिसांकडून (Police) केला जात आहे.




