Saturday, January 24, 2026
Homeक्राईमNashik Bribe News : सिन्नरच्या नायब तहसीलदाराला अडीच लाखांची लाच स्वीकारताना अटक

Nashik Bribe News : सिन्नरच्या नायब तहसीलदाराला अडीच लाखांची लाच स्वीकारताना अटक

नाशिक | Nashik

काही दिवसांपूर्वीच सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या (Sinnar MIDC Police Station) आवारात पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (ACB Squad) अटक (Arrested) केली होती. त्यानंतर आता ही घटना ताजी असतानाच सिन्नरच्या नायब तहसीलदाराला अडीच लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडले आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, संजय भिकाजी धनगर (वय ५१) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. जमिनीचा अनुकूल निकाल लावून देण्याच्या बदल्यात धनगर यांनी तक्रारदाराकडे १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. अखेर, तडजोडीअंती अडीच लाखांमध्ये हे प्रकरण निकाली काढायचे ठरले. त्यानुसार, शहरातील सोपान रूग्णालयासमोर लाच स्वीकारत लाचलुचपत पथकाने सापळा रचून धनगर यांना अटक केली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांत (Mumbai Naka Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player

दरम्यान, नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानाआधी त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे देखील नगरपरिषदेतील (Trimbak Nagarparishad) दोन कर्मचाऱ्यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत पथकाने रंगेहात पकडले होते. या प्रकरणात तक्रारदाराला त्र्यंबकेश्वर येथील स्व:तच्या भूखंडावर नवीन घराचे बांधकाम सुरू करायचे आहे. यासाठी वास्तूविशारदामार्फत नगरपालिकेकडे ऑनलाईन कागदपत्रे सादर करून विहित शुल्काचे चलनही भरले होते. परंतु, बांधकामाची परवानगी प्राप्त झाली नाही. त्यामुळे १८ नोव्हेंबर रोजी तक्रारदार कार्यालयात विचारणा करण्यासाठी गेले असता तेव्हा त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेतील रचना सहायक (वर्ग दोन) मयूर शाम चौधरी याने स्वताच्या भ्रमणध्वनीवर २५ हजार असे टाईप करून ही रक्कम सफाई कामगार अमोल दोंदे याच्याकडे देण्यास सांगितले. तडजोडीअंती १० हजार रुपयांची रक्कम देण्याचे निश्चित झाले होते. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय नाशिक (ACB Office Nashik) येथे तक्रार दिली होती. यानंतर सापळा रचून एसीबीने दोंदे आणि चौधीर यास अटक केली होती.

ताज्या बातम्या

Bihar Bhavan : “राज ठाकरे महाराष्ट्राचे राजे आहेत का? आम्ही मुंबईत…”;...

0
मुंबई | Mumbai येथील मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरातील एलफिंस्टन एस्टेटच्या जागेवर ३० मजली बिहार भवन (Bihar Bhavan) उभारण्याची योजना आहे. यासाठी सुमारे ३१४.२० कोटी रुपयांचा...