नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरातील वाहतुकीस शिस्त (Transport Discipline) लागावी व बेशिस्त चालकाना वाहतूक नियमांची जाणीव व्हावी, यासाठी नाशिक शहर वाहतूक शाखेतर्फे बुधवारपासून (दि.१८) बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईसाठी विशेष ड्राईव्ह सुरु करण्यात आला आहे. त्यानुसार बुधवारी पहिल्या दिवशी शहरात ४६० बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक विना हेल्मेट आणि सिग्नल मोडणाऱ्या चालकांवर (Drivers) कारवाई केली आहे. ही कारवाई, निरंतर सुरु राहणार असल्याचे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी स्पष्ट केले आहे.
शहरात बेशिस्त बाहन चालकांमुळे अपघात, अपघाती मृत्यू, बाहतूक कोंडी असे प्रश्न निर्माण होतात. वारंवार प्रबोधन, कारवाई करूनही चालक शिस्त पाळत नसल्याने अपघात व वाहतूक कोंडीची समस्या सुटत नाही. त्यामुळे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी (Traffic police) विशेष मोहिम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उपआयुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या सूचनांनुसार बुधवारी शहरात वाहतूक पोलिसांनी मोहिम राबवली. त्यात सायंकाळी पाचपर्यंत ४६० बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. काही कारवाईमध्ये वाहने जम केल्याचे समजते.
दरम्यान, वाहतूक नियमांचे उल्लघन करणाऱ्या वाहनचालकांविरूध्द सिग्रल जंपिंग, राँग साईड चाहतूक, राँग पार्किंग, बेदरकारपणे वेगात वाहन चालविणे, तसेच इतर वेगवेगळ्या शिर्षकाखाली संयुक्त कारवाई (Action) सुरु असून मोहिमेचे पर्यवेक्षण पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत, प्रशांत बच्छाव व चंद्रकांत खांडवी हे करत आहेत.
केलेली कारवाई
वाहतूक नियम | बेशिस्त चालक |
हेल्मेट नसणे | ९७ |
सीटबेल्ट नसणे | ३३ |
ट्रीपल सीट | २३ |
नो पार्किंग | ०८ |
काळी फिल्म काच | ०५ |
नो एन्ट्रीत वाहने | ५७ |
सिग्नल मोडणे | ८७ |
मोबाइलचा वापर | ०१ |
झेब्रा क्रॉसिंग | ०१ |
इतर | १३८ |
एकूण | ४६० |