Friday, May 3, 2024
HomeनाशिकVideo : नाशकात उद्यापासून असे असतील निर्बंध

Video : नाशकात उद्यापासून असे असतील निर्बंध

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकमधील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नाशकात निर्बंध लादण्यात आले आहेत. नाशिकमध्ये अंशतः लॉकडाऊन राहणार असून वीकेण्डला सर्व धार्मिक स्थळे बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकार्यानी आज सांगितले.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत मांढरे बोलत होते. ते म्हणाले की, उद्यापासून सर्व कॉलेज कोचिंग क्लासेस बंद राहतील. दहावी च्या परीक्षा पालकांची संमती घेऊन मुले उपस्थित राहतील.

परीक्षा राज्य किंवा राष्ट्रीय परीक्षा पूर्व घोषित असतील त्या नियमितपणे होतील. नाशिक नांदगाव निफाड आणि मालेगाव मधील शाळा बंद करणार आहोत.

करोनाचा संसर्ग जास्त असल्याने निर्णय घेण्यात आला आहे. इतर तालुक्यांचा निर्णय परिस्थिती पाहून निर्णय घेतले जातील. सकाळी सात ते रात्री सात ही वेळ निश्चित करण्यात आले आहे.

सर्व आठवडे बाजार बंद राहतील. १५ तारखे पर्यंत लग्न समारंभ पोलीस प्रशासनाची परवानगी आटोपून घ्यावेत. त्यानंतर सार्वजनिक कार्यक्रम बंद असतील.

त्यानंतर घरगुती पद्धतीने हे कार्यक्रम होतील. हॉटेल, बार, परमिटरूम सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत सुरु राहतील.

जिम, ग्राउंड व्यक्तिगत स्वरुपात सुरु राहतील एकत्रित येणार नाही. धार्मिक समारंभ बंद करण्यात आले आहेत.

धार्मिक स्थळे सकाळी ७ ते रात्री सात पर्यंत सुरु राहतील. शनिवार आणि रविवार सर्व धार्मिक स्थळे बंद राहतील.

भाजी मंडई ५० टक्के उपस्थितीत सुरु राहील. करोना जनजागृती करण्यास सुरुवात करण्यात येईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या