Sunday, June 14, 2026
Homeक्राईमNashik Crime : टोकडे येथे टोळक्याकडून दगड, धारदार शस्त्रांनी हल्ला; ८ ते...

Nashik Crime : टोकडे येथे टोळक्याकडून दगड, धारदार शस्त्रांनी हल्ला; ८ ते १० जण जखमी

नाशिक | Nashik

मालेगाव तालुक्यातील (Malegaon Taluka) टोकडे (Tokade) येथे दुर्गादेवी यात्रेनिमित्त आयोजित तमाशाच्या कार्यक्रमादरम्यान मध्यरात्री गंभीर हिंसक घटना घडली. कार्यक्रम सुरू असताना काही समाजकंटकांच्या टोळक्याने अचानक दगडफेक करत तसेच धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात सुमारे ८ ते १० जण जखमी झाले असून, जखमींमध्ये एका लहान बालकाचाही समावेश आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : पाइप अंगावर पडल्याने कामगाराचा मृत्यू

हल्लेखोरांनी गावात घुसून दोन घरांची तोडफोड करत काही वाहनांची नासधूस केली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ आणि धावपळ उडाली. तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने तमाशाचा कार्यक्रम तात्काळ बंद करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच गावातील (Village) पोलीस पाटील यांनी तत्काळ तालुका पोलीस स्टेशनला कळवले. त्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.

हे देखील वाचा : Crime News : सरकारी सल्लागाराची गुंडगिरी; माफियांच्या बचावासाठी थेट ज्येष्ठास एनकाउंटरची धमकी

दरम्यान, पोलिसांनी (Police) घटनास्थळावरून काही धारदार हत्यारे ताब्यात घेतली असून, टोळक्यातील काही संशयितांना अटक (Arrested) करण्यात आली आहे. तसेच काही हल्लेखोर फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीसांकडून विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे. तर जखमींना तातडीने मालेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात होते. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू असून, सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. याप्रकरणी पोलीसांकडून पुढील तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : महायुतीची ‘सेफ हाऊस’ पॉलिटिक्स; शिवसेनेनंतर भाजपचेही...

0
नाशिक | Nashik स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election) पार्श्वभूमीवर महायुतीने (Mahayuti) आपल्या नगरसेवकांना एकत्र ठेवण्याची रणनीती आखली आहे. शिवसेनेचे (शिंदे...