Saturday, May 31, 2025
Homeक्राईमNashik Crime : आरोग्य भरतीच्या नावे दीड कोटींचा गंडा; साक्री तालुक्यातील डॉक्टरसह...

Nashik Crime : आरोग्य भरतीच्या नावे दीड कोटींचा गंडा; साक्री तालुक्यातील डॉक्टरसह ९० जणांची फसवणूक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

राज्याच्या आरोग्य खात्यांतर्गत नाशिक व धुळे (Nashik and Dhule) येथे कंत्राटी नोकरभरतीची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. साक्री येथील डॉक्टरसह ९० बेरोजगारांना नाशकातील महिलेसह अलिबाग येथील एकाने सुमारे १ कोटी ३८ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. नाशिक शहरातील (Nashik City) अशोकस्तंभभागात शिवांजली सोल्युशन्स नावाने कार्यालय थाटून ही फसवणूक करण्यात आली. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) गुन्हा नोंदवण्यात आला असून फसवणूक झालेल्या बेरोजगार तरुण-तरुणींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आता प्रकरणातील दोघा संशयितांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

कविता प्रशांत भदाणे (रा. सद्‌गुरू पार्क, ध्रुवनगर, सातपूर लिंकरोड) व वैभव विजय पोळ (रा. ब्राह्मणअळी, ता. अलिबाग, जि. रायगड) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात धुळे जिल्ह्यातील (Dhule District) साक्री तालुक्यातील डॉ. कुणाल गुलाबराव भदाणे (३८) यांनी फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान, संशयित कविता ही डॉ. कुणाल यांच्या शालकाची पत्नी असून मे २०२३ मध्ये कविताने डॉ. कुणाल यांना संपर्क साधून धुळे व नाशिक येथील आरोग्य खात्यात कंत्राटी स्वरुपात सफाई कामगार, शिपाई, चालक, पर्यवेक्षक, लॅब टेक्निशियन, नर्सिंगची नोकरभरती सुरू असल्याचे सांगून कुणी होतकरू व गरजू उमेदवार असतील तर अशोकस्तंभ येथील कार्यालयात पाठवून देण्यास सांगितले. प्रारंभी कुणाल यांनी नकार दिला असता कविताने सातत्याने त्यांना संपर्क केला व उमेदवार पाठवण्यास सांगितले.

कुणाल हे साक्रीतील (Sakri) प्रतिष्ठित असल्याने ओळखीतील काही नागरिक, पालक व बेराजगार त्यांच्याकडे कुठेही नोकरीसाठी प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांनी कविताचा संदर्भ देऊन ९० जणांना शिवांजली सोल्युशन्स येथे पाठवले. तेव्हा कविता यांनी प्रत्येक उमेदवाराकडून दीड ते दोन लाख रुपये घेतले. मात्र, अनेक महिन्यांचा कालावधी लोटूनही कुणाही उमेदवारास नोकरी मिळाली नाही. त्यामुळे उमेदवारांनी डॉ. कुणाल यांचे घर गाठून त्यांच्याकडे पैशांचा तगादा लावला. अखेर डॉ. कुणाल यांनी ४५ उमेदवारांना ५७ लाख १५ हजार रुपये दिले, तर संशयित कविता भदाणे व वैभव पोळ यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली.

दरम्यान, वारंवार पैशांची (Money) मागणी केल्यानंतर कविताने डॉ. कुणाल यांना ५० हजार रुपये तर उमेदवारांना २ लाख रुपये परत केले. मात्र उर्वरित पैसे देण्यास टाळाटाळ केली. फसवणूक (Fraud) झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. कुणाल भदाणे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली. तपास सहाय्यक निरीक्षक नरेंद्र बैसाने करत आहेत.

आकडा वाढण्याची शक्यता

डॉ. कुणाल यांच्या फिर्यादीनुसार, फसवणूक झालेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता असून २०० ते ३०० उमेदवारांनी पैसे जमा केले आहेत. उमेदवारांकडून गोळा केलेल्या १ कोटी ४० लाख रुपयांपैकी २९ लाख रुपये कविता यांनी कमिशन म्हणून स्वतःकडे ठेवले तर उर्वरित १ कोटी ११ लाख रुपये वैभव पोळ यास दिले आहेत. संशयितांनी नाशिक, साक्री, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील सुमारे दोनशेहून अधिक उमेदवारांकडूनही पैसे घेतल्याचे डॉ. कुणाल यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

हॉटेलातील बैठका निष्फळ

कुणाल यांनी पाठपुरावा केल्याने ऑक्टोबर २०२४ मध्ये कविता व पोळ यांनी नाशिकसह पनवेल येथे हॉटेलात खासगी बैठका घेतल्या. तेव्हा पोळ याने कविता ही एजंट असून माझ्यामार्फत ती काम करते. ती कमिशन काढून मला उर्वरित पैसे पाठवत असल्याचे सांगून सर्व पैसे लवकराच लवकर परत करू असे कविता व पोळ यांनी कुणाल व व इतरांना सांगून लिहून दिले तसेच काही सिक्युरिटी चेकही दिले. मात्र, तरीही पैसे मिळाले नाही.

ठळक मुद्दे

* एकूण १ कोटी ४० लाख रुपयांचा झोल.
* कविताने २९ लाखांचे कमिशन घेतले.
* पोळला पाठवले १ कोटी ११ लाख रुपये.
* कविताने केवळ अडीच लाख रुपये परत केले.
* १ कोटी ३७ लाख ५० हजार रुपयांचा अपहार.
* पोळने स्वतःला शासकीय कंत्राटदार भासवले.
* कवितासह पोळचे साथीदार रडारवर.
* दोघांचे बँक खाते गोठवणार.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : गोरक्षकावर हल्ला, हात-पाय बांधून लुटले

0
पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) तालुक्यातील तिसगाव येथील गोरक्षक भारत लिपारे (वय ३९) यांच्यावर ९ जणांच्या टोळक्याने हल्ला करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात लिपारे...