Friday, November 22, 2024
HomeनाशिकNashik Crime News : निशाचा मृत्यू संशयास्पद नव्हे तर खूनच

Nashik Crime News : निशाचा मृत्यू संशयास्पद नव्हे तर खूनच

पती विरोधात अखेर गुन्हा दाखल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पाथर्डी शिवारातील (Pathardi Shivar) सदाशिवनगर येथील कृष्णा प्राईड अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये गुरुवारी (दि.२९) दुपारी संशयास्पद अवस्थेत आढळलेल्या निशा मयूर नागरे (३३) हिचा खून झाल्याचे शुक्रवारी (दि. ३०) वैद्यकीय अहवालातून निष्पन्न झाले. त्यानुसार इंदिरानगर पोलिसांनी निशाचा फरारी पती मयूर नागरे याच्यावर खून (Murder) केल्याचा गुन्हा दाखल करून त्याच्या शोधार्थ पथके रवाना केली आहेत. निशाचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले असून मयूरची अटक झाल्यावरच खुनाचे नेमके कारण समोर येणार आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! नाशिक-डहाणू नवीन मार्गाच्या अंतिम लोकेशन सर्वेक्षणास रेल्वे मंत्रालयाची मंजुरी

इंदिरानगर पोलिसांच्या (Indira Nagar Police) माहितीनुसार, निशा ही मुंबईतील हॉटेलमध्ये कामास होती, तर तिचा पती मयूर नागरे याचे कोणार्कनगर येथे हॉटेल असल्याचे समोर आले होते. बुधवारी (दि. २८) दुपारी नागरे यांच्याकडे घरकामास असलेल्या मोलकरीण या निशाच्या घरी कामास गेल्या असता निशा व मयूर यांनी त्यांना सांगितले की, आम्हाला हॉटेलला जायचे आहे. तुम्ही काम लवकर आवरा. त्यानुसार संगीता काम आवरून घरी परतल्या.

हे देखील वाचा : यंदा गणेशोत्सवात ‘लेव्हल खाली’ ठेऊनच डीजेचा दणदणाट; पोलिस आयुक्तांनी दिल्या ‘या’ सुचना

त्यानंतर गुरुवारी (दि.२९) दुपारी नेहमीप्रमाणे साडेबारा ते एकच्या सुमारास त्या कामासाठी पुन्हा निशा यांच्या घरी गेल्या. त्यांनी चावीने दरवाजा उघडला असता आतमधील बेडवर निशा निपचीत पडल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी इमारतीतील (Building) इतर रहिवाशांना माहिती दिली. रहिवाशांनी पोलिसांना कळवले होते. पोलिसांनी घटनास्थळासह मृतदेहाचा पंचनामा करून तो उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला.

हे देखील वाचा : Vidhan Sabha Election 2024 : अजित पवारांची राष्ट्रवादी विधानसभेच्या ‘इतक्या’ जागा लढविण्यासाठी आग्रही

दरम्यान, शुक्रवारी (दि.३०) सकाळी फॉरेन्सिक पथकाच्या उपस्थितीत शवविच्छेदन केले असता निशाच्या मानेवर व अन्य शरीरावर गंभीर इजा असल्याचे समोर आले. तर तिचा गळा आवळून श्वास गुदमरल्याने अनैसर्गिक मृत्यू (Death) झाल्याचा अभिप्राय वैद्यकीया अधिकाऱ्यांनी नोंदवला. त्यानुसार प्रथमदर्शनी निशाचा पती मयूर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

हे देखील वाचा : मंत्री तानाजी सावंत पुन्हा वादात, शेतकऱ्याची थेट औकात काढली… व्हिडिओ व्हायरल

पथके मागावर

निशाचा मृतदेह (Dead Body) आढळल्यावर पोलिसांना तिचा पती मयूरवर संशय बळावला. त्यामुळे इंदिरानगर पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके गुरुवारी सायंकाळीच मयूरच्या मागावर रवाना करण्यात आली. त्याचे लोकेशन पोलिसांना काहीअंशी मिळाले असून लवकरच त्याला अटक (Arrested) होणार आहे. त्यानंतर या खुनाच्या कारणाचा उलगडा होणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या