Thursday, May 29, 2025
Homeक्राईमNashik Crime : अनैतिक संबंधातून टोळीयुद्ध; दोन्ही गटांवर गुन्हा, दोन महिलांसह चौघे...

Nashik Crime : अनैतिक संबंधातून टोळीयुद्ध; दोन्ही गटांवर गुन्हा, दोन महिलांसह चौघे ताब्यात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

रविवार कारंज्यासह (Raviwar Karanja) शहरात दहशत माजवणाऱ्यांनी आपापसातील भांडणे व अनैतिक प्रेमसंबंधातून एकमेकांवर प्राणघातक हल्ले चढवल्याची घटना रविवारी (दि. २५) रात्री मुंबईनाका पोलिसांच्या (Mumbai Naka Police) हद्दीतील इनायत कॅफेसमोर घडली. त्यात युवती, तिचा पती व युवतीच्या मित्रासह त्याच्या साथीदाराने भररस्त्यात टोळीयुद्ध (गैंगवार) भडकवले. त्यामुळे परिसरात दहशत पसरली. काही पादचाऱ्यांनी या हल्ल्याचा लाईव्ह व्हिडीओ रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर टीकेची झोड उठताच शहर पोलिसांनी गुन्हे दाखल करुन तरुणींसह संशयितांना ताब्यात घेतले. सर्वच संशयित मद्याच्या नशेत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

दीपक संजय कपिले (वय ३५, रा. गोरेराम गल्ली, रविवार कारंजा, नाशिक), दिगंबर उर्फ दत्ता निवृत्ती आंधळे (वय ३४, रा. राजशक्ती रो-हाऊस, कलानगर, दिंडोरी रोड, नाशिक), दीपक उर्फ रोहित रंगनाथ गोरडे (वय ३२, मूळ रा. दीक्षित चाळ, खैरे गल्ली, जुने नाशिक, सध्या रा. एन ४२, त्रिमूर्ती चौक, सिडको), मयूरी गोरडे (वय ३१), ऐश्वर्या विकास भुजंग (रा. मुंबई नाका) अशी संशयितांची नावे आहेत. कपिलेच्या गळ्यावर धारदार हत्याराने (Weapon) वार करण्यात आल्याने त्याला बावीस टाके पडले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार संशयित दीपक व वरील एका महिलेचे अनैतिक संबंध आहेत. तसेच कपिले व गोरडे दाम्पत्य व आंधळे यांचे गेल्या काही महिन्यांपासून जुने वादही सुरु आहेत. कपिलेच्या फिर्यादीनुसार रविवारी (दि. २५) रात्री दहाच्या सुमारास तो घरी असतांना गोरडेच्या पत्नीने संपर्क साधला. ‘पतीसह तीन महिला इनायत कॅफेजवळ मद्यपान करीत असताना एकीचा नवरा आला व तो मैत्रिणीस बेदम मारहाण (Beating) करत आहे’, असे सांगून त्याला तिने बोलवून घेतले. तेव्हा कपिले व त्याचा मित्र दत्ता आंधळे हे कॅफेजवळ आले असता त्यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला. गोरडेने शिवीगाळ करीत ‘तुला आज ठरवून बोलावले आहे, तुझा गेमच वाजवतो’ असे म्हणत कपिलेवर हल्ला केला. कमरेला लावलेले धारदार हत्यार काढून कपिलेच्या गळ्यावर वार करण्यात आले.

महिलेचीही फिर्याद

फिर्यादीनुसार, संशयित दीपक कपिले याच्यासोबत तिचे आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. विवाहानंतरही तिच्या व दीपक यांच्या भेटीगाठी सुरु होत्या. दरम्यान, ४ महिन्यांपासून ती दीपकसोबत बोलत नसल्याने दीपकने दुसऱ्या विवाहितेसोबतचे व्हिडीओ आणि फोटो तिला पाठवले. त्यानंतर तिने माहेर गाठत दुसऱ्या विवाहितेचा शोध घेत दीपकला व्हिडीओ कॉल केला. तसेच दुसऱ्या विवाहितेकडे दीपकविरोधात तक्रार करुन आम्ही आठ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले. त्याचा राग आल्याने दीपकने तक्रारदार प्रेयसीस शिवीगाळ केली. त्यानंतर दोघे पुन्हा बोलत होते. रविवारी दोन्ही विवाहिता रोहितसह हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मुंबईनाका पोलीस परस्परविरोधी दाखल गुन्ह्यांचा तपास करत आहेत.

ठळक मुद्दे

* गोरडे हा माजी नगरसेविकेच्या कारचा चालक.
* कपिलेचा पिझ्जा हट विक्रीचा व्यवसाय.
* मार्च २०२३ मध्ये कपिलेची फूड व्हॅन जाळण्यात आली.
* त्याच्याकडे खंडणी मागणीबाबत आदीत्य उर्फ घाऱ्या मोरेवर गुन्हा.
* मयुरीने अटकेनंतर फिर्याद दिली; कपिलेंचा आक्षेप.
* व्हिडीओतील मारहाणीमुळे कपिलेवर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा.
* आंधळे हा माजी स्थायी समिती अध्यक्षांचा नातलग.
* गोरडे दाम्पत्यास शिवशक्ती चौकातून अटक.
* युनिट एकने केली गोरडे दाम्पत्य, भुजंग, आंधळेला अटक.
* हाणामारीचा अर्धवट व्हिडीओ व्हायरल

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : लिफ्ट मागून लुटणारे गजाआड; चालकास चाकूचा धाक दाखवून...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik मुंबईतील महिंन्द्रा कंपनीच्या प्लांटमधून नवेकोरे पिकअप (Pickup) वाहन ताब्यात घेऊन त्याची नाशिकमार्गे उत्तर प्रदेशातील इच्छितस्थळी पोहोचवण्यासाठी निघालेल्या चालकाकडे दोन सराईतांनी...