Tuesday, September 17, 2024
Homeक्राईमNashik Crime News : सीबीआयच्या नावाखाली १२ लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा

Nashik Crime News : सीबीआयच्या नावाखाली १२ लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा

इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri

- Advertisement -

तब्बल ७ कोटीची मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) व सीबीआयच्या (CBI) नावाखाली १२ लाखांची फसवणूक (Fraud) झाल्याची घटना इगतपुरीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात (Igatpuri Police Station) ३ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : बाटल्या डाेक्यात फाेडून हल्ला; गुन्हे दाखल

याबाबत फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी विजय खन्ना याचा २८ ते ३० ऑगस्टला ७९७७३८०१९८ आणि ८३७४६१९८२७ या नंबरवरून व्हॉट्सअपवर कॉल येऊन त्यात आम्ही सीबीआयमधुन पोलीस अधिकारी (Police Officer) बोलत असल्याचे त्याने खोटे सांगितले. यानंतर फिर्यादीला त्याची सर्व माहिती विचारून तुमच्या विरूध्द कॅनरा बँकेत मनी लॉन्ड्रिंगची केस दाखल आहे. तुम्ही नरेश गोयल यांच्यासोबत मिळुन ७ कोटींची मनी लॉन्ड्रिंग केलेली आहे.याबाबत कुणाला काही माहिती दिली तर तुमच्या कुटुंबाला त्रास होईल अशी खोटी धमकी देऊन त्यांना घाबरविले.

हे देखील वाचा : Nashik Crime News : केंद्रीय पणन अधिकारी लाच घेतांना ताब्यात

तसेच व्हॉट्सअप कॉल, स्काईप अँप व्हिडीओ कॉल करून तुम्हाला केसमध्ये मदत करू असे खोटे सांगितले. त्यासाठी त्याने भारतीय स्टेट बँकेच्या गुरगाव शाखेतील खाते क्रमांक 41103864856 यावर १२ लाख रुपये टाकण्यास सांगितले.त्यानुसार कुटुंबाला त्रास होईल म्हणुन भारतीय स्टेट बँक शाखा इगतपुरीच्या (Igatpuri) ११५४२१६६६४९ या खात्यावरून फिर्यादीने धनादेशाने १२ लाख रुपये टाकले. मात्र, आपली फसवणुक झाल्याचे समजताच रामप्रताप रामदेव यादव (वय ७६) रा. धम्मगिरी इगतपुरी यांनी इगतपुरी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली.

हे देखील वाचा : ST Bus Strike : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटणार? सरकारने बोलावली तातडीची बैठक

दरम्यान, पोलिसांनी (Police) फिर्यादीनुसार संशयित आरोपी विजय खन्ना, राहुल गुप्ता, रेखा मॅडम (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच माहिती आणि तंत्रज्ञान कायदा २००५ चे कलम ६६ (क),६६ (ड) आणि भा. न्या. स. कलम २०४, ३१८(४) नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांनी पुढील तपास सुरु केला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या