नाशिक | प्रतिनिधी | Nashik
अंबड-माऊली लॉन्स रस्त्यावर संशयितांनी दोघांवर धारदार हत्यारांसह बिअरच्या बाटल्यांनी प्राणघातक हल्ला (Assault) केला. मोहम्मद कैफ अनजर खान (१९, रा. पाकिजा अपार्टमेंट, केवल पार्क, अंबड) याच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (दि. ३१) रात्री अकराच्या सुमारास तो आणि मित्र सिराज रहीम खान हे दुचाकीने जात असताना माऊली लॉन्सजवळील सोनल डेअरीजवळ कारमधून चौघे संशयित (Suspect) आले. त्यांनी दुचाकीला पाठीमागून धडक दिली.
हे देखील वाचा : ST Bus Strike : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटणार? सरकारने बोलावली तातडीची बैठक
त्यानंतर संशयितांनी मोहम्मद खान याच्यावर धारदार हत्यार व बिअरच्या बाटली (Beer Bottles) डोक्यात फोडून हल्ला करीत गंभीर जखमी केले. तसेच, त्याचा मित्र सिराज याच्यवरही धारदार हत्याराने मारून दोघांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. चौघेही संशयित सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात अंबड पोलिसात (Ambad Police) प्राणघातक हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील वाचा : ऐन सणासुदीत ‘लाल परी’ची चाके थांबली, प्रवाशांना मोठा फटका
सातपूरला जुन्या वादातून काेयत्याने वार
सातपूरमधील (Satpur) अंबिका स्वीट दुकानाजवळ टोळक्याने एकावर हल्ला करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तुषार गंगाधर मोंढे (२०, रा. सातपू कॉलनी), करण कृष्णा नांगरे (२१,रा. राजवाडा, सातपूरगाव), अर्जुन कृष्णा नांगरे (१९, राजवाडा सातपूर गाव) अविनाश विष्णू गांगुर्डे (२६, रा. महादेववाडी, सातपूर), साहिल देविदास गांगुर्डे (२३, रा. सातपूर कॉलनी), सोनू अनिल सोळसे (१९, रा. महादेव वाडी), अक्षय शार्दुल (२४, रा. महादेववाडी), गौरव वाबळे (२०, रा. महादेववाडी, सातपूर) अशी संशयितांची नावे आहेत.
हे देखील वाचा : मनमाड – इंदूर नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी
नागेश युवराज शार्दुल (२४, रा. महादेव वाडी, सातपूर) याच्या फिर्यादीनुसार, संशयित टोळक्याने शनिवारी (ता. ३१) रात्री दहाच्या सुमारास वादाची कुरापत काढून जीवे ठार (Killed) मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करीत कोयत्याने हल्ला चढविला. यात त्याच्या डोके, कपाळ, डोळ्याजवळ, खांद्यावर, छातीवर कोयत्याने गंभीर जखमा झाल्या आहेत. याप्रकरणी सातपूर पोलिसात संशयितांविरोधात प्राणघातक हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, संशयित तुषार मोंढे, करण नांगरे, अर्जून नांगरे या तिघांना अटक (Arrested) केली आहे. उपनिरीक्षक नळकांडे हे तपास करीत आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा