Thursday, January 8, 2026
HomeनाशिकNashik Crime News : साठ लाखांच्या खंडणीची मागणी; कंपनी चालकाची न्यायालयात तक्रार

Nashik Crime News : साठ लाखांच्या खंडणीची मागणी; कंपनी चालकाची न्यायालयात तक्रार

आर्थिक व्यवहारातून वाद

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भागीदारीतून झालेल्या आर्थिक व्यवहारांतील (Financial Transactions) वादातून दाेघांनी एका कंपनी मालकास पिस्तूलाचा धाेका दाखवून साठ लाखांच्या खंडणीची (Extortion) मागणी केली. कंपनी विकून पैसे दे, नाहीतर कुटुंबास जीवे ठार करण्याची धमकी दिल्याची तक्रार कंपनी चालकाने न्यायालयात दाखल केली. त्यानुसार न्यायालयाच्या आदेशाने नाशिकराेड पाेलीस ठाण्यात दाेघांविरुद्ध गुन्हा (Case) नाेंद झाला आहे. सचिन नवनाथ आहेर आणि सुनील खाेकले अशी संशयितांची नावे आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Sharad Pawar : “सत्तेचा माज काहींच्या डोक्यात…”; शरद पवारांचा केंद्र आणि राज्य सरकारवर हल्लाबोल

YouTube video player

तक्रारदार नंदू रामदास माेरे (वय ३६, रा. चिंचाेडी बु. ता. येवला) यांच्या फिर्यादीनुसार शिंदे-नायगाव राेडवर (Shinde-Naygaon Road) एक कंपनी आहे. ९ जुलै २०२३ राेजी रात्री साडेनऊ वाजता, ते कंपनीत असतांना संशयित आहेर व खाेकले आले. त्यांनी, माेरे व त्यांचे भागीदार संपत सोनवणे यांच्यामध्ये झालेल्या व्यवहाराच्या देण्याघेण्यातून माेरे यांच्या माथ्याला पिस्तूल लावून धकमकावत साठ लाख रुपयांची खंडणी मागितली. तर, हे पैसे दिले नाही तर तुला व तुझ्या कुटुंबाला संपवून टाकीन अशी धमकी दिली.

हे देखील वाचा : Nitin Gadkari : “मला विरोधकांनी पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती”; नितीन गडकरींचा मोठा गौप्यस्फोट

तुझी कंपनी बंद कर, बंद केली नाहीतर पैसे कसे काढायचे मला माहिती आहे. माझा मित्र विजय व सर्जेराव सोनवणे हे जरी तुझ्या व्यवसायात भागीदार नसले, तरी तुला पैसे द्यावे लागतील. नाहीतर तुझी कंपनी विकून पैसे दे, अशी धमकी दिली. यानंतर वर्षभरानंतर माेरे यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली. त्यानुसार न्यायालयाने (Court) नाशिकराेड पाेलिसांनी (Nashik Road Policce) संबंधितांवर गुन्हा दाखल करुन सखाेल तपासाचे आदेश दिले. त्यान्वये गुन्हा नाेंद झाला असून तपास पाेलीस करत आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरात पोलीस पथकावर जमावाचा हल्ला

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur श्रीरामपुरातील वार्ड नं.1 इराणी गल्ली परिसरात शासकीय कर्तव्यावर असलेल्या पोलीस पथकावर हल्ला करण्याची, जमावाला भडकावून आरोपी सोडवण्याची आणि कोयत्याने जीवे मारण्याचा प्रयत्न...