Sunday, November 3, 2024
Homeब्रेकिंग न्यूजNitin Gadkari : "मला विरोधकांनी पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती"; नितीन गडकरींचा मोठा...

Nitin Gadkari : “मला विरोधकांनी पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती”; नितीन गडकरींचा मोठा गौप्यस्फोट

नागपूर | Nagpur

भाजपमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या नावाची पंतप्रधानपदासाठी (PM Post) नेहमीच चर्चा होत असते. मात्र, त्यांना या पदापासून आतापर्यंत दूरच राहावे लागले आहे. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) भाजपला (BJP) एकहाती बहुमत मिळाले होते. त्यावेळीही लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांचे नाव पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आले होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळालेले नाही.या निवडणुकीत भाजपने २४० जागा जिंकल्या. त्यामुळे भाजपने टीडीपी व जेडीयूच्या मदतीने केंद्रात सरकार स्थापन केले आणि नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले.

- Advertisement -

हे देखील वाचा : उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा तीन मजली इमारत कोसळली; नऊ जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले

या सरकारमध्ये नितीन गडकरी हे सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री झाले आहेत.अशातच आता स्वतः गडकरी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षाच्या (Opposition Party) एका वरिष्ठ नेत्याने त्यांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शनिवारी (दि.१४) नागपूर (Nagpur) येथे विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या स्व.अनिलकुमार पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते.

दै. ‘देशदूत’चा ५५ वा वर्धापन दिन 2024 आरोग्यम् मुलाखत – विषय : महिलांनी तणावमुक्त जिवन जगावे

यावेळी बोलताना ते म्हणाले की, “काही दिवसांपूर्वी एक घटना घडली. या घटनेतील नेत्याचे नाव मी तुम्हाला सांगणार नाही. पण त्याने मला सांगितले होते की, तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. त्यावर मी त्यांना विचारलं की तुम्ही मला पंतप्रधानपदासाठी का पाठिंबा देणार आणि तो पाठिंबा मी का घ्यावा? मी त्या नेत्याला स्पष्टपणे सांगितलं की, पंतप्रधानपद हे माझ्या आयुष्यातील ध्येय नाही. मी माझ्या तत्वांशी आणि पक्षसंघटनेशी एकनिष्ठ आहे. मी पंतप्रधानपदासाठी तत्त्वांशी आणि पक्षाशी प्रतारणा करणार नाही. ही तत्त्वं हीच भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे”, असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Neeraj Chopra : फक्त एक सेंटीमीटरची चूक, नीरज चोप्राचं स्वप्न भंगल… Diamond League स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर मानावे लागले समाधान

दरम्यान, २०१४ पासून नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त भाजपमध्ये इतर कोणीही पंतप्रधानपदासाठी दावा केलेला नाही. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधान कोण होणार याची चर्चा पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्यानंतर योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) अमित शाह (Amit Shah) यांची नावे पंतप्रधानपदासाठी चर्चेत आल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता त्यात नितीन गडकरी यांच्या नावाची भर पडली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या