नाशिक | प्रतिनिधी | Nashik
भाडेतत्वावर ‘फ्लॅट’ घेत वास्तव्य करतानाच, संशयित (Suspect) मित्र-मैत्रिणीने फ्लॅटमालक शेतकऱ्यास बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत बळकावण्याचा प्रयत्न केला. ही घटना उपनगर हद्दीतील (Upnagar Area) ‘संघमित्रा’ हाैसिंग साेसायटीजवळ घडली असून शीबू अॅन्थाेनी जाेसेफ व त्याची मैत्रिण प्रियंका अतुल साेनवणे-वाघ यां संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे.
नाशिक तालुक्यातील (Nashik Taluka) विंचूर- दळवी येथील दाेनवाडे शिवारात राहणारे अशाेक केशवराव ढुबे हे शेतकरी असून उपनगर भागातील संघमित्रा हाै. साेसायटीजवळील दत्त प्रसाद बिल्डिंगमध्ये त्यांच्या मालकीची सदनिका आहे. दरम्यान, ही सदनिका त्यांनी काही महिन्यांपूर्वी संशयित शीबू व प्रियंका यांच्या मागणीनुसार भाडेतत्वावर दिली. त्यानंतर, २३ ऑगस्ट २०२५ राेजी संशयितांनी संगनमत करुन ही सदनिका बळकावण्याच्या इराद्याने ‘प्लॅन’ आखला. ढुबे हे साेसायटीत हजर असताना जाेसेफ व प्रियंका यांनी ‘फ्लॅट’ खाली करुन हवा असेल तर, दहा लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल, असा दम भरला.
यावरत न थांबता, प्रियंका वाघ बलात्काराच्या गुन्ह्यात तुला अडकवून जेलमध्ये टाकेल व तिचे पंटर तुझा गेम करून टाकतील’ असा दम भरुन खंडणीची मागणी केली. अचानक घडलेल्या या प्रकाराने ढुबे पुरते भेदरले. त्यांनी तत्काळ उपनगर पाेलीस ठाणे (Upnagar Police Station) गाठून घडलेला प्रकार पाेलिसांना सांगितला. त्यानुसार गुन्हा नाेंद असून दाेघांचाही शाेध सुरु आहे.
दाेघेही बेराेजगार
जाेसेफ व प्रियंका हे एकमेकांच्या ओळखीचे असून मागील काही महिन्यांपासून मित्र आहेत. दाेघेही बेराेजगार असल्याची माहिती पाेलिसांनी दिली असून नागरिकांना अशाच पद्धतीने जाळ्यात ओढून ते गुजराण करतात, अशी माहिती समाेर आली आहे. त्यांचा शाेध सुरु असल्याचे कळते. विशेष म्हणजे प्रियंका हिचा घटस्फाेट झाला असून काही दिवसांपूर्वी एका गुन्ह्यात अटक झाल्यावर ती सध्या कारागृहात असून तिचा ताबा घेतला जाणार आहे, असे पाेलीस उपनिरीक्षक शशिकांत पवार यांनी सांगितले.





