Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमNashik Crime : अवैध सावकारी उजेडात; तक्रारीनंतर घरझडतीत मिळाले स्टॅम्पपेपर, कोरे धनादेश

Nashik Crime : अवैध सावकारी उजेडात; तक्रारीनंतर घरझडतीत मिळाले स्टॅम्पपेपर, कोरे धनादेश

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

अवैध सावकारीला (Money Lenders) आळा घालण्यात नाशिक सहकार विभागाला अपयश येत असतानाच विभागाकडे अनेक तक्रारी अर्जावर तत्काळ कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात आहे. अशातच, विभागाने एका तक्रार अर्जानुसार नुकतीच कारवाई करुन वडाळागावासह गंगापूर रोडवरील (Gangapur Road) दोघा अवैध सावकारांवर गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. दोघांच्या घरझडतीत संशयास्पद व्यवहारांचे टीपण, कोरे धनादेश व स्टॅम्पपेपर जप्त आढळल्याने ते जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे शहरात सावकारी राजरोस सुरुच असल्याचे पुनश्च अधोरेखित होत आहे.

- Advertisement -

एम. डी. इतेशम (रा. ममताज महल, जेएमसीटी कॉलेजसमोर, वडाळा रोड, नाशिक) व सनी चंद्रकांत जाधव (रा. एकदंत सोसायटी, मोतीवाला कॉलेजशेजारी, ध्रुवनगर गंगापूर रोड, नाशिक) अशी संशयित अवैध सावकारांची नावे आहेत. अवैध सावकारीला पिचलेल्या गंगापूर रोडवरील एका तक्रारदाराने संशयितांच्या (Suspected) तगाद्याला कंटाळून आणि संशयित अवैध सावकारी करत असल्याचे समजताच त्याने सहकार विभागाचे दार ठोठावले. विभागाच्या अखत्यारित मोडणाऱ्या सावकारी नियंत्रण अधिकाऱ्यांना भेटून कैफियत मांडत अर्ज सादर केला. त्यानंतर ‘सहकार’च्या पथकाने अर्जाची दखल घेऊन कालांतराने चौकशी सुरु केली.

YouTube video player

त्यानुसार, सावकारी नियंत्रण पथक ८ मे रोजी संशयित इतेशम व जाधवच्या घरी तसेच गंगापूर रोडवरील प्रसाद सर्कलजवळच्या न्यू स्टार चिकन सेंटरमध्ये जाऊन धडकले. संशयितांची चौकशी करुन घराची व दुकानाची झडती घेतली असता वरील संशयास्पद कागदपत्रे (Document) आढळून आली. विशेष म्हणजे पथकास कलम सोळाच्या अहवालानुसार संशयित अवैध सावकारीचा व्यवसाय करीत असल्याचे निष्कर्ष समोर आले. त्यानुसार, सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशाने सरकार पक्षाच्यावतीने शैलेश पोतदार यांनी १७ जुलै रोजी फिर्याद नोंदविली आहे. तपास, उपनिरीक्षक भरत पाटील करत आहेत. दोघांनी मिळून अवैध सावकारी केल्याचे प्राथमिक पुरावे पथकाच्या हाती लागले आहेत.

अटक होणार?

संशयितांना अद्याप अटक झाली नसून त्याबाबतची कारवाई सुरु आहे. दोघांनी या आधी किती पैसे व्याजाने दिले, किती पटीने वसूली केली, तक्रारदारांचा कषा पद्धतीने तगादा लावला, यासह अन्य बाबी उघड झाल्या नसून सखोल तपासात कारनामे समोर येण्याची शक्यता आहे. तसेच, सावकारीचा जाच व छळाबाबत तत्काळ तक्रारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची...

0
नाशिक | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून...