Friday, February 6, 2026
Homeक्राईमNashik Crime : भरदिवसा तरुणीवर प्राणघातक हल्ला; हल्लेखोर ताब्यात

Nashik Crime : भरदिवसा तरुणीवर प्राणघातक हल्ला; हल्लेखोर ताब्यात

नाशिक | Nashik

शहरातील अनंत कान्हेरे मैदानावर (गोल्फ क्लब) (Anant Kanhere Ground) एका तरुणीवर एका मुलाने भरदिवसा प्राणघातक हल्ला (Attack) केल्याची घटना आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली आहे. हल्ला करणाऱ्या मुलाला पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम प्रकरणातून तरुणीवर (Girl) हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून (Police) व्यक्त केला जात आहे. मात्र, अद्याप या हल्ल्यामागचे कारण स्पष्टपणे समजू शकलेले नाही. तर हल्ला केल्यानंतर उपस्थित नागरिकांनी या मुलाला चांगलाच चोप दिला.

YouTube video player

दरम्यान, याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. तसेच या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला पुढील उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात (District Hospital) तातडीने दाखल करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : सोनईला मोरे, आश्वीला शिरसाठ प्रभारी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील आश्वी, सोनई पोलीस ठाण्यासह साई मंदिर सुरक्षा, शिर्डीसाठी नवीन प्रभारी पोलीस अधिकारी देण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी...