Friday, April 25, 2025
Homeक्राईमNashik Crime : अर्थकारणाच्या खेळीने कैद्यांकडे मोबाईल

Nashik Crime : अर्थकारणाच्या खेळीने कैद्यांकडे मोबाईल

स्वच्छतागृहात पुरलेला फोन हस्तगत, सीमकार्डची माहिती मिळेना

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गुन्हेगारांसह (Criminals) संशयितांचे आश्रयस्थान असलेले नाशिकरोडचे मध्यवर्ती कारागृह (Nashik Road Central Jail) पुन्हा एकदा विशेष चर्चेत आले आहे. धारदार कटर, पेन, गुटखा, तंबाखू आढळल्यानंतर कारागृहात आता पुन्हा मोबाईल आढळून आला आहे. आतून चोरीछुप्या पद्धतीने बाहेरील साथीदारांशी मोबाईलवरुन संपर्क साधत नवे कट कारस्थान शिजविण्यासह अन्य प्लॅनिंग करण्यासाठी बॅरेकमध्येच मोबाईलची (Mobile) व्यवस्था होत आहे की काय? असे असल्यास ‘तेरी भी चूँप, मेरी चूप’ या उक्तीनुसार येथील कामकाज चालते का ? किंवा यात काही नवे अर्थकारण आहे का, अशी चर्चा सुरु आहे.

- Advertisement -

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शौचालयाच्या पाठीमागील जागेतील जमिनीत (Land) मोबाइल पुरुन ठेवल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी तुरुंगाधिकाऱ्यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात (Nashik Road Police Station) अज्ञाताविरोधात फिर्याद दाखल केली आहे. तुरुंगाधिकारी हिरालाल देवराम भामरे (४२) यांच्या फिर्यादीनुसार, २७ डिसेंबर रोजी कारागृहात नियमित तपासणीदरम्यान, मंडळ ७ मधील सर्कल दोनच्या बॅरेक क्रमांक आठच्या परिसरात मोबाइल आढळून आला.

सायंकाळी सहाच्या सुमारास तुरुंग प्रशासनाने तपासणी केली. त्यावेळी सर्कल क्रमांक २ च्या परिसरातील शौचकुपीच्या पाठीमागील जागेत जमिनीत तंबाखूच्या प्लास्टिक पिशवीत लाल रंगाचा छोटा मोबाइल लपवून ठेवल्याचे आढळले. त्यामुळे पथकाने मोबाइल जप्त केला आहे. तुरुंग प्रशासनाने यासंदर्भात नाशिकरोड पोलिसांकडे (Police) मोबाइल देत अज्ञात व्यक्तीविरोधात फिर्याद दाखल केली आहे. तपास उपनिरीक्षक संदीप पवार करत आहेत.

सीमकार्ड गायब?

नाशिकरोड पोलिसांनी मोबाइल जप्त केला असून त्यामध्ये सीमकार्ड नसल्याचे आढळून आले आहे. आता तांत्रिक तपासाच्या आधारे या मोबाइलमध्ये कोणते सीम टाकण्यात आले? कुणाच्या नावे होते याचा तपास सुरु झाल्याचे समजते. मात्र, त्यात प्रगती नसल्याची बाब समोर येत असून कारागृहातील प्रत्येक पॉईंटवर चोख सुरक्षा व्यवस्था असताना मोबाईलमध्ये गेलाच कसा, त्या मागे हेतू काय? कुणाचा होता, कुणाशी काय संपर्क झाला या प्रश्नांचा उलगडा कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कारागृहातील कारनामे

याआधी कैद्यांकडून आत्महत्येंचे प्रयत्न
कैद्यांकडून याआधी एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले
त्रिस्तरीय सुरक्षा, सामान्यांना प्रतिबंध
मोबाईल आतमध्ये कुणी पाठविला?
कारागृहातून फोनवर संवादाची सुविधा, तरी बँरेकात मोबाईल कसा?
वारंवार कटर, मोबाईल मिळण्याचे गौडबंगाल?

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...