Saturday, January 24, 2026
HomeनाशिकNashik Crime : नाशकात खूनसत्र थांबेना; जुन्या भांडणाची कुरापत काढून युवकाची हत्या

Nashik Crime : नाशकात खूनसत्र थांबेना; जुन्या भांडणाची कुरापत काढून युवकाची हत्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जुन्या भांडणाची कुरापत काढून येथील गोरेवाडी परिसरात एका युवकावर (Youth) चार जणांच्या टोळक्याने धारदार शास्त्राने हल्ला केला. त्याला जीवे ठार मारण्याचा प्रकार नाशिकरोड येथील गोरेवाडी परिसरात घडला असून हल्ला करणाऱ्या चौघांपैकी दोघेजण अल्पवयीन आहेत. या सर्वांना नाशिकरोड पोलिसांनी (Nashik Road Police) ताब्यात घेतले असून याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गेल्या सव्वा नऊ महिन्यांतील ४३ वा खून आहे.

- Advertisement -

गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास फिर्यादी ज्योती मनोज अहिरे (३२) या त्यांचा भाऊ कृष्णा व लहान बहीण छायासमवेत मतेश जेडगुले यांनी आयोजित केलेल्या दांडियाच्या कार्यक्रमाला गेले होते. रात्री सव्वाअकरा वाजेच्या सुमारास दांडिया खेळून घरी जात असताना वाटेत त्यांना मोईन शेख भेटला. त्याच्यासोबत प्रकाश ऊर्फ असू बारसे व दोन विधिसंघर्षित बालके असे होते. दोन दिवसांपूर्वी कृष्णा आणि मोईन यांच्यात भांडण झाले होते. यावेळी मोईन कृष्णाला म्हणाला, आपण दोन दिवसांपूर्वी झालेला वाद बोलून मिटवून घेऊ. असे म्हणत ते सर्व जण कृष्णाला घेऊन जाधववाडीकडे गेले.

YouTube video player

ज्योती अहिरे यांना शंका आल्याने त्या कृष्णाचा मित्र तिलक मेहरुलिया याला घेऊन त्यांच्या पाठीमागे गेले. संतोष जाधव यांच्या घराच्या पाठीमागे असलेल्या गल्लीत मोईन शेखने मागील भांडणाची कुरापत काढून कृष्णाच्या पाठीत धारदार शस्त्र खुपसले. त्याचवेळी प्रकाश व एका विधिसंघर्षित बालकाने त्यांच्याकडील कोयत्याने कृष्णावर वार केले. हे सर्व जण कृष्णाला लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) करु लागले. भावाला वाचविण्यासाठी ज्योती आहिरे आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे घाबरून सर्व हल्लेखोर तेथून पळून गेले.

दरम्यान, रक्ताच्या थारोळ्यात कृष्णा तिथे पडलेला असताना ज्योतीने तिलकच्या मदतीने कृष्णाला बिटको रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले. तेथे डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले. तेथे डॉक्टरांनी कृष्णाला तपासून मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस रुग्णालयात (Hospital) दाखल झाले. त्यांनी तपासाची चक्रे फिरवत रात्रीच सर्व आरोपींना (Suspected) ताब्यात घेतले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कोरडे करीत आहेत.

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’चे दिमाखदार उद्घाटन

0
नाशिक | प्रतिनिधी Nasik नाशिकमधील घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरणाऱ्या दैनिक ‘देशदूत’ आयोजित ‘गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ चे आज (दि. २३ जानेवारी) उत्साही...