Thursday, October 31, 2024
Homeक्राईमNashik Crime News : अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई

Nashik Crime News : अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांची (Nashik Rural Police) अवैध व्यवसायांविरोधात (illegal liquor) संपूर्ण जिल्ह्यात कारवाई करत ३३ संशयितांविरोधात ३६ गुन्हे दाखल करण्यात आले.

- Advertisement -

हे देखील वाचा : Thackeray vs Shinde Shivsena : राज्यातील ‘या’ विधानसभा मतदारसंघांत होणार मशाल-धनुष्यबाण थेट सामना

महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता (Code of Conduct) लागु करण्यात आली असून, त्या पार्श्वभूमीवर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांचे मार्गदर्शनाखाली दि. १५ ऑक्टोबरपासून नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलातर्फे अवैध व्यवसायांविरोधात व्यापक स्वरूपात कारवाई करण्यात येत आहे.

हे देखील वाचा : Maharashtra Assembly Election 2024 : महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला आला समोर; पाहा कुणाच्या वाट्याला किती जागा?

तर २८ व २९ ऑक्टोबर रोजी नाशिक ग्रामीण (Nashik Rural) व मालेगाव विभागातील पोलीस ठाणे हद्दीतील विविध ठिकाणी अवैध देशी दारू विक्री करणारे व गावठी हातभट्टीची दारू बनविणारी ठिकाणे, त्यामध्ये डोंगर, दऱ्या, नदी, नाले अशा अतिदुर्गम ठिकाणांवर पायपीट करून, तसेच ड्रोन कॅमेरेंद्वारे पाहाणी करून वरील ठिकाणांचा शोध घेवून छापे टाकण्यात आले आहे.या कारवाईत अवैधरित्या देशी दारूविक्री करणारे तसेच गावठी हातभटटी दारु बनवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून, नाशिक ग्रामीण जिल्ह्यात ३३ संशयितांविरूध्द एकूण ३६ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

हे देखील वाचा : Nashik Political : शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान, या कारवाईत (Action) २६ हजार रूपयचे किमतीची देशी दारू जप्त करण्यात आली. तसेच हातभट्टीची गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन २५ हजार २६५ लिटर व तयार गावठी दारु ४९९ लिटर व इतर साहित्य सामग्री असा ९६ हजार ९०० मुद्देमाल नाश करण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस ठाणेनिहाय (Police Station) वरीलप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या