नाशिक | प्रतिनिधी | Nashik
गुन्हेगारी नियंत्रणासाठी पोलिसांनी (Police) विविध छोट्यामोठ्या संशयितांची धरपकड़ करुन त्यांना ‘अद्दल’ घडविल्यानंतर आता आयुक्तालयाने बेशिस्त रिक्षा चालकांच्या दिशेने मोर्चा वळविला आहे. शहर वाहतूक पोलीस (Trafic Police) आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाने एकत्रित धडक मोहीम राबवून रिक्षा चालकांना ‘शिस्तीत’ आणण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्यावरील या संयुक्त कारवाईला ‘ऑटो रिक्षा शिस्त’ मोहीम असे नाव देण्यात आले असून रविवारपासून (दि. २५) कारवाईस सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या पाच दिवसांत तेराही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी ४१७रिक्षांसह चालकांवर कायदेशीर कारवाई केली असून काहींचा ‘विशेष’ पाहुणचार ही करण्यात आला आहे.
शहरातील मध्यवर्ती भागासह बाजारपेठांलगत काही बेशिस्त रिक्षा चालकांमुळे वाहतूक नेहमीच विस्कळीत होत आहे. ज्या रिक्षा चालकांबाबत तक्रारी प्राम आहेत. त्यांच्यावर पूर्वी गुन्हे नोंद आहेत, अशांवर आता आरटीओ व पोलीस संयुक्त तपासणीसह कारवाई करणार आहेत. दरम्यान, पोलिसांनी गत पाच दिवसांत ४०० हून अधिक रिक्षाचालकांवर (Rickshaw Drivers) घेट गुन्हे नोंदवून न्यायालयात प्राडले आहे. त्यामुळे काही रिक्षा चालकांची मुजोरी घटली असून, संघटनांसह ठराविक रिक्षाचालकांची ‘दादागिरी’ रोखण्यासाठी पोलिसांनी अधिक कठोर भूमिका घेतली आहे. शहरातील पन्नासपेक्षा जास्त ठिकाणी नाकाचंदी करून रिक्षा तपासणी सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नागरिकांनाही तक्रारीचे आवाहन केले असून, यापुढे घेट गुन्हे नोंदवून कायदेशीर कारवाईचा इशारा आयुक्तालयाने दिला आहे.
पन्नास ठिकाणी नाकाबंदी
गंगापूररोड, कालेजरोड, मुंबई नाका, त्र्यंबक नाका, रविवार कांरजा, अशोकस्तंभ, शालीमार, सीबीएस, सिटी सेंटर मॉल, आनंदवल्ली, सारडा स्केल, ठक्कर बाजार, पैलड कॉर्नर, बाजारपेठ, मालेगाव स्टॅन्ड, दिंडोरी नाका, पंचवटी कारंजा, पेठ फाटा, मखलमाबाद नाका, रामकुंड, संतोष टी पॉइंट, छत्रपती संभाजीनगर नाका, नांदूर नाका, जत्रा हॉटेल, अमृतधाम, जेलरोड, बिटको बौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, रेल्वे स्टेशन, सुभाष रोड़, मुक्तीधामसमोर, उपनगर नाका, दत्तमंदिर, द्वारका, त्रिमूर्ती बौवा, पाथर्डी फाटा, सातपूर, श्रमिकनगर, बारदान फाटा, पपया नगरी, एकरलो मंइट, फाळके स्मारक, गरवारे टी पॉइंट, लेखानगर, इंदिरानगर, भगूर, देवळाली गाव, देवळाली कॅम्प, संतरी नाका या प्रमुख चौकांसह इतरत्र पोलीरा व आरटीओने रविवारी (दि. २५) धडक तपाराणी मोहीम राबवली.
अनेक जण दिसले ‘शिस्तीत’
पोलीस ठाणे अमलदार तसेच वाहतूक शाखेच्या पथकांनी सुरु केलेल्या कारवाईचा धसका अनेक चालकांनी घेतला आहे. त्याची फलश्रुती थेट त्यांच्या वागण्या, बोलण्यात दिसत असून बहुतांश रिक्षाचालक आता निर्धारित गणवेश परिधान करुन व्यवसाय करत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, कारवाईतून काही सराईत व टवाळखोर चालक अलगद निसटत असून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याची अपेक्षा प्रवाश्यांनी व्यक्त केली आहे.
ठळक मुद्दे
- जेलरोड, द्वारका, शालिमार, पंचवटीत कारवाईचा जोर वाढणार
- सत्त्यावर पोलिसांचे दर्शन होताच काही चालक देत आहेत गुंगारा
- बहुतांश चालकांनी घेतला धसका, काही चालक अजूनही सुसाटव
- बसस्टॅन्ड, महत्वाच्या चौकांत मोहीम उपेक्षित
- अनेक जण कारवाईच्या मितीने पगार, रिक्षा गोपविल्या मालकांकडे
… असे आहेत नियम
- रिक्षा चालकाने त्याचे नाव, परवाना धारकाचे नाव, परवाना क्रमांक, बेंच, चालकाचा परवाना क्रमांक रिक्षेच्या आतील दर्शनी
- भागात लावणे सर्व रिक्षा चालकानी निर्धारित गणवेश परिधान करावा, गणवेशावर आरटीओने दिलेले बॅच स्पष्टपणे दिसणे अनिवार्य
- परवाना संपलेल्या व तांत्रिकदृष्ट्या अयोग्य किंवा धोकादायक रिक्षा चालवितांना आढळल्यास रिक्षा परवाना निलंबित होईल
- धोकादायकरिव्या व ओव्हर स्पीड स्वरुपात रिक्षा चालविणाऱ्यांवरः कायदेशीर कारवाई




