Thursday, September 19, 2024
Homeक्राईमNashik Crime News : दहशत पसरवणारे दोन संशयित ताब्यात; आडगाव गुन्हे पथकाची...

Nashik Crime News : दहशत पसरवणारे दोन संशयित ताब्यात; आडगाव गुन्हे पथकाची कामगिरी

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

- Advertisement -

विडीकामगार नगरमध्ये (Vidikamgar Nagar) धारधार शस्त्र हातात घेऊन बुधवार (दि.०४) रोजी रात्रीच्या वेळी दहशत निर्माण करण्याऱ्या दोन संशयितांना (Suspect) ताब्यात घेण्यास आडगाव गुन्हे पथकास यश मिळाले आहे. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात (Adgaon Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.

हे देखील वाचा : Nashik Crime News : उच्चभ्रू साेसायटीतील देहव्यापार प्रकरण; दलाल महिलेचा भागीदार अटकेत

विडीकामगार नगरमध्ये बुधवार (दि.०४) रोजी रात्रीच्या वेळी दोन संशयित (Two Suspect) धारदार शस्त्र हातात घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी गस्त घालीत असताना पोलिस अंमलदार दिनेश गुंबाडे यांना विडीकामगार नगरमध्ये धारधार शस्त्र हातात घेऊन दहशत निर्माण करणारे दोन ही संशयित अमृतधाम परिसरातील गंगोत्री विहारजवळ असल्याची माहिती मिळाली.

हे देखील वाचा : “शिंदेंच्या शिवसेनेचा अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न”; जयंत पाटलांचे मोठे विधान

त्यानुसार  संशयित रोशन सुधाकर कटारे (वय २२, रा. मालुबाईचे दुकाना मागे बिडीकामगारनगर अमृतधाम नाशिक) , साई सुधीर पाटील (वय २१, रा. रेशीमबंध लॉन्स पाठीमागे हिरावाडी पंचवटी नाशिक) यांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. यावेळी या दोन्ही संशयितांकडून धारधार शस्त्र (Weapon) हस्तगत करण्यात आले.

हे देखील वाचा : Nashik Crime News : अलिशान साेसायटीत कुंटणखाना; पीसीबी-एमओबीचा छापा, महिलेसह दलाल अटकेत

यांनी बजावली कामगिरी

दरम्यान, सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (Sandeep Karnik) परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पंचवटी विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त पद्मजा बढे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक सचिन खैरनार, गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक निखील बोंडे, पोलिस हवालदार ज्ञानेश्वर कहांडळ, देवराम सुरंजे, दादासाहेब वाघ, निलेश काटकर, पोलिस  अंमलदार दिनेश गुंबाडे, निखिल वाघचौरे, सचिन बाहिकर,अमोल देशमुख, महिला पोलिस अंमलदार वैशाली महाले यांनी केली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या