Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमNashik Crime : कारागृह की 'चरस यार्ड' भविष्याची वाटचाल 'बिअर-डिस्को बार'कडे; एसआयटीद्वारे...

Nashik Crime : कारागृह की ‘चरस यार्ड’ भविष्याची वाटचाल ‘बिअर-डिस्को बार’कडे; एसआयटीद्वारे तपासाची मागणी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह (Nashik Road Central Jail) हे आता केवळ कैद्यांचे सुधारगृह न राहता अंमली पदार्थांच्या तस्करी व सेवनाचे सुरक्षित ‘चरस व गांजा यार्ड’ बनले आहे. सध्याची स्थिती पाहता भविष्यात येथे ‘बिअर व डिस्को बार’ सुरू हाेण्याचा अवकाश असून  कारागृहातील कैद्यांकडे अतिशय निर्धाेकपणे अमली व मादक पदार्थ मिळत असल्याने हे ‘रॅकेट’ नेमके काेण चालवित आहे, याचा अंदाज पाेलीसांना आला आहे.  याआधीही अनेकदा कैद्यांकडे अमली पदार्थ आढळले असून या तस्करीत कुणाचे हात काळे झाले आहेत, याचा शाेध नव्या ‘एसआयटी’ ने घ्यावा, अशी मागणी तुरुंगातून मरणयातना भाेगून आलेल्या काही तत्कालिन कैद्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर केली आहे.

- Advertisement -

कारागृह प्रशासनाच्या (Jail Administration) अंगझडतीत बंदीवानांकडे तब्बल १ लाख ७ हजार ८०० रुपये किमतीचे चरस, गांजा व मेफेड्रॉन (एमडी) जप्त झाल्याने सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा उघड झाल्या आहेत. कारागृहासारख्या अतिसंरक्षित ठिकाणी अंमली पदार्थ (Drugs) पोहोचणे हे निष्काळजीपणाचे नव्हे, तर अंतर्गत रॅकेट सक्रिय असल्याचे स्पष्ट संकेत देणारे आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे. या प्रकरणी कारागृह हवालदार सुनील सोमा रोकडे यांनी कारागृह अधीक्षक अरुणा मुगुटराव यांच्या आदेशानुसार नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

YouTube video player

त्यानुसार शिक्षाबंदी दिलीप कचरू साळुंके व न्यायबंदी स्वप्निल दिनेश उन्हवणे यांच्यासह एका अज्ञात व्यक्तीविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १० डिसेंबर रोजी कारागृहातील मंडल क्रमांक ७ मधील यार्ड क्रमांक १ व ४ येथे उघडकीस आला. नाशिकरोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पंडित अहिरे तपास  करीत आहेत.

नेमका प्रकार काय?

सकाळी सव्वा नऊच्या सुमारास फिर्यादी सुनील रोकडे हे शिक्षाबंदी लक्ष्मण चोरमले याला वैद्यकीय कारणासाठी अधीक्षकांकडे नेत असताना, यार्ड क्रमांक १ व ४ च्या मुख्य फाटकाजवळ दिलीप साळुंके हा कचरा कुंडीत काहीतरी टाकून परत येताना दिसला. संशय आल्याने रोकडे यांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे अंमली पदार्थ आढळून आला. त्यानंतर कारागृह अधिकारी जगदीश ढुमणे यांच्यासमोर साळुंकेची सखोल झडती घेण्यात आली. त्याच्याकडे काळ्या टेपमध्ये गुंडाळलेला गोळा मिळून आला, ज्यामध्ये चरस व गांजा असल्याचे त्याने कबूल केले. चौकशीत साळुंके याने हा माल न्यायबंदी स्वप्नील उनवणे याच्या सांगण्यावरून नेहमीच्या ठिकाणाहून उचलून पोहोच केल्याचे सांगितले.

कारागृहातील फोनवरुन रॅकेट

माहितीनुसार, न्यायबंदी स्वप्नील उनवणे याने कारागृहातील अधिकृत संपर्क दूरध्वनीचा वापर करत आतेभाऊ प्रवीण विलास मोहिते याच्याशी बहिणीच्या क्रमांकावरून कॉन्फरन्स कॉलद्वारे संपर्क साधला. या संभाषणात अंमली पदार्थांची मागण्यात आले. त्यानुसार ९ डिसेंबर रोजी मोबाईल अ‍ॅपद्वारे १३ हजार रुपये पाठवण्यात आले. याच पैशांच्या आधारे अज्ञात व्यक्तीमार्फत अंमली पदार्थ कारागृहात पोहोचवण्यात आले. 

जप्त मुद्देमाल असा

  • १०४ ग्रॅम चरस (किंमत सुमारे १ लाख रुपये)
  • ३१.५ ग्रॅम गांजा (६,३०० रुपये)
  • मेफेड्रॉनसदृश्य अंमली पदार्थ (१,००० रुपये)
  • इतर प्रकारचा अंमली पदार्थ (५०० रुपये)

ताज्या बातम्या

Imtiaz Jaleel : छत्रपती संभाजीनगरचे वातावरण तापले! इम्तियाज जलील यांच्या गाडीवर...

0
छत्रपती संभाजीनगर । Chhatrapati Sambhajinagar महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडाला असतानाच शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एमआयएमचे (MIM) प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज...