Friday, November 22, 2024
Homeक्राईमNashik News : युवती आत्महत्याप्रकरणी संतप्त महिलांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा

Nashik News : युवती आत्महत्याप्रकरणी संतप्त महिलांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा

आरोपींना कडक शासन करण्याची मागणी

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

येथील देवळाली गाव (Deolali Gaon) परिसरातील राजवाडा भागात राहणाऱ्या एका पंधरा वर्षाच्या युवतीने (Young Girl) परिसरात राहणाऱ्या युवकाच्या (Youth) त्रासाला कंटाळून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली होती. सदर घटनेप्रकरणी संबंधित युवक व त्याच्या नातेवाईकांना कठोर शासन करून त्यांना अटक (Arrested) करण्यात यावी, या मागणीसाठी परिसरात राहणाऱ्या संतप्त महिलांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. तसेच यासंबंधी नाशिकरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना निवेदन देण्यात आले.

- Advertisement -

हे देखील वाचा : “आदिवासी असल्यामुळेच माझ्यावर…”; ऑलिम्पिक धावपटू कविता राऊतचा सरकारवर गंभीर आरोप

देवळाली गाव राजवाडा परिसरात राहणाऱ्या एका युवतीला याच भागात राहणारा कलाम इजहार मन्सुरी हा युवक छेडछाड करून तिला त्रास देत होता. त्याचप्रमाणे सदरची युवती कॉलेजला (Collage) जात असताना व येत असताना तिचा पाठलाग करून छळ करीत असे. या त्रासाला कंटाळून सदर युवतीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचा प्रकार चार ते पाच दिवसापूर्वी घडला होता. या घटनेनंतर नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) कलाम इजहार मन्सुरी याच्याविरुद्ध तसेच इतर नातेवाईकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Gujarat Floods : गुजरातमध्ये पावसाचे थैमान; २६ जणांचा मृत्यू, तर १८ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले

मात्र, यातील आरोपीवर पोलिसांनी (Police) अद्याप पाहिजे तशी कारवाई केली नसल्याने संतप्त झालेल्या देवळाली गाव राजवाडा येथील महिलांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यावर मोर्चा (March) काढून पोलिसांना जाब विचारला. तसेच संबंधित आरोपीला अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी या महिलांनी केली. या मोर्चात प्रज्ञा उघडे, ज्योती इंगळे, आशा खडसे, दीक्षा आढाव, वनिता उघडे, मीना भालेराव, छाया गौंड, वंदना अहिरे, ज्योती पंडित यांच्यासह शेकडो महिला (Women) सहभागी झाल्या होत्या.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या