नाशिक | प्रतिनिधी | Nashik
एसीबीच्या (ACB) नाशिक परिक्षेत्रात सन २०२३ मध्ये १६३ सापळ्यांत २७४ संशयितांवर (Suspected) गुन्हे नोंदवले होते. त्यामुळे २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये लाचखोरीत (Bribery) घट झाली की, कारवाई थंडावली, हा प्रश्न उपस्थित होत आहे. सन २०२४ मध्ये विविध शासकीय विभागांमध्ये झालेल्या लाचखोरीमुळे नाशिकमध्ये १५१ सापळे रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २१९ संशयितांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहे.
परिक्षेत्रात नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश असून, एसीबीने वर्षभरात अनेक गैरव्यवहार उघड केले आहेत. पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी पदभार स्वीकारल्यापासून अनेक मोठ्या अधिकाऱ्यांवर सापळा कारवाई (Action) केल्याने नाशिकच्या पथकांचे राज्यभरात कौतुक झाले. त्यामध्ये भूमी अभिलेख, सहकार विभाग, महसूल व शिक्षण विभागातील मोठ्या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली.
दरम्यान, या सर्व कारवायांनुसार गैरव्यवहारांमध्ये राज्यात नाशिकच्या (Nashik) पहिला क्रमांक असल्याचे दुर्दैवाने अधोरेखित झाले आहे. त्यामुळे नववर्षात (New Year) लाचखोरीला रोख लावण्यासह गैरव्यवहार करणाऱ्यांना अटकाव करण्याचे आव्हान एसीबीसमोर कायम आहे.
लाचखोरी अशी
सन २०१४ मध्ये राज्यात सापळा, अपसंपदा व अन्य भ्रष्टाचार एकत्रित करून १३१६ गुन्हे नोंद झाले. तर २०१५ मध्ये १२७९, २०१६ मध्ये १०१६, २०१७ मध्ये ९२५, २०१८ मध्ये ९३६, २०२० मध्ये ८९१, २०२१ मध्ये ७७३, २०२२ मध्ये ७४९, २०२३ मध्ये ८१२ तर २०२४ मध्ये ७१६ गुन्हे नोंद झाले. नाशिकमध्ये सर्वाधिक १५१ गुन्ह्यांची नोंद झाली.
नाशिक परिक्षेत्र
अधिकारी वर्ग | संशयित |
वर्ग – १ | १७ |
वर्ग – २ | २० |
वर्ग – ३ | ११२ |
वर्ग – ४ | १४ |
इतर लोकसेवक | २० |
खासगी इसम | ३६ |