Thursday, May 15, 2025
Homeक्राईमNashik Crime : नवखे ड्रग्जपेडलर अटकेत; नाशिकच्या दोघांकडून खरेदी, NDPS पथकाची कारवाई

Nashik Crime : नवखे ड्रग्जपेडलर अटकेत; नाशिकच्या दोघांकडून खरेदी, NDPS पथकाची कारवाई

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

शहरातील दोघा ड्रग्ज ‘डीलर्स’कडून एमडी (MD) खरेदी करुन पवननगर बाजारासह इतरत्र विक्री करणाऱ्या दोन ड्रग्जपेडलर तरुणांना (Youth) नाशिक अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) अटक केली आहे. दोघांकडून दीड लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोघेही बेरोजगार असल्याचे समजते, त्यांनी नाशिकमधूनच एमडी खरेदी केल्याचे पथकाला सांगितले असून आता या स्थानिक पेडलरचा शोध सुरु करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (CP Sandeep Karnik) यांनी अमली पदार्थांचे ‘रॅकेट’ शोधण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुन्हे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी एनडीपीएसला सूचना केल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक सुशीला कोल्हे यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार बुधवारी (दि. १४) मध्यरात्री सापळा रचण्यात आला. त्यानुसार साहिल उर्फ विवेक अनिला गांगुर्डे (वय २४) व अमित उर्भ अभि नितीन पाटील (२०, दोघे रा. पवननगर) या संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

सहाय्यक निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील, सहाय्यक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, संजय ताजणे, देवकिसन गायकर, अंमलदार बाळासाहेब नांद्रे, अविनाश फुलपगारे, चंद्रकांत बागडे, भारत डंबाळे, गणेश वडजे, योगेश सानप व अर्चना भड यांनी ही कारवाई केली. दरम्यान, दोघांकडून पंचेचाळीस हजार रुपयांचा ९.५ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आला.यासह मोबाइल व रोख रकमेसह १ लाख ३२ हजार दोनशे तीस रुपयांचा एकूण मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

दरम्यान, या दोघांविरुद्ध अंबड पोलिसांत (Ambad Police) गुन्हा नोंद असून, तपास अंबड पोलीस करत आहेत. तसेच एमडीच्या या कारवाईनंतर कायदेशीर कारवाईसाठी अंबडच्या संबंधित निरीक्षकांनी विलंब केल्यावर वरिष्ठांपर्यंत बाब पोहोचल्यावर पुढील सूत्रे वेगाने फिरल्याचे पोलीस ठाण्यात ऐकू आले. अंबड पोलिस ठाण्याच्या ‘प्रभारी’ पद सातत्याने वादात असून, तेथे अधिक दमदार अधिकारी नेमण्याची अपेक्षा नागरिकांनी (Citizen) व्यक्त केली आहे.

विविध चर्चा सुरु

अंबड पोलिसांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांसह गुन्हेगारी फोफावली असताना त्या ठिकाणी सर्रास एमडी विक्री होत असल्याचे उघड झाले आहे. एनडीपीएसने (NDPS) एमडीची कारवाई केल्यानंतर अंबड पोलिसांनी मात्र कानावर हात ठेवल्याची चर्चा ऐकू आली. काही महिन्यांपूर्वी पोलीस ठाण्याच्या ‘प्रभारी’ पदाचा कार्यभार स्वीकारलेल्या निरीक्षकांच्या कार्यपद्धतीसंदर्भातही अंबड हद्दीत विविध चर्चा सुरू आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra News : सीसीटीव्ही लावा, सेवकांची मद्य चाचणी करा; राज्य सरकारची...

0
मुंबई | Mumbai  महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) लहान मुलांचे लैंगिक शोषण थांबवण्यासाठी राज्यातील शाळांसाठी नवी नियमावली जाहीर केली. त्यानुसार राज्यातील प्रत्येक शाळांत सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे...